Sugar Season Maharashtra : साखर हंगामावर दुष्काळाचे सावट; उत्पादन घटलं, उताऱ्यात मात्र कोल्हापूर आघाडीवर

Sugar Production : राज्यात १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू झाला. दरम्यान गाळपामध्ये पुणे विभागाने बाजी मारली आहे पंरतु कोल्हापूर विभाग साखर उत्पादनात आघाडीवर आहे.
Sugar Season Maharashtra
Sugar Season Maharashtraagrowon

Maharashtra Sugar : राज्यात १ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू झाला. दरम्यान गाळपामध्ये पुणे विभागाने बाजी मारली आहे पंरतु कोल्हापूर विभाग साखर उत्पादनात आघाडीवर आहे. राज्यात अद्यापपर्यंत ४ कोटी ३९ लाख ३६ हजार टन गाळप पूर्ण झाले.

कोल्हापूर जिल्ह्यात गाळप हंगाम तब्बल ३ आठवडे लांबणीवर गेला असला तरी साखर उत्पादनात आघाडीवर आहे. यंदा अल् निनोमुळे पाऊस झाला नसल्याने उसाचे उत्पादनही घटले आहे.

पाऊस कमी झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात ८३ लाख टनांनी उसाचे उत्पादन घटले असल्याने साखर उत्पादनही घटणार आहे. मागच्या वर्षी १०५ लाख टन गाळपपूर्ण झाले होते परंतु यंदा ९० लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता साखर तज्ज्ञांनी व्यक्त केली होती परंतु ९० लाखांचा टप्पाही गाठणे कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यंदा अत्यंत कमी पाऊस झाल्याने खरिप हंगामासह ऊस पिकावर मोठा परिणाम झाला आहे. ऊसदराच्या आंदोलनामुळे हंगाम महिनाभर उशिरा सुरू झाला. त्यामुळे उसाचे उत्पादन घटले असले तरी उतारा चांगला येत असल्याचे चीत्र आहे. राज्यात ९७ सहकारी व १०० खासगी, अशा १९७ कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. या कारखान्यांमध्ये ४ कोटी ८३ लाख टनांचे गाळप केले असून, त्यातून ४ कोटी ३९ लाख ८६ हजार क्विंटल साखर उत्पादित झाली.

Sugar Season Maharashtra
Malegaon Sugar Mill : ऊस तोडणी, वाहतूकदार यंत्रणेला समन्वयातून वागवा

गत हंगामात याच काळात २०२ कारखान्यांनी ५ कोटी ६६ लाख ९७ हजार टनांचे गाळप करून ५ कोटी ३६ लाख ५४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. कारखान्यांची गाळपाची गती पाहता, हंगामाची सरासरी गाठताना यंदा कारखान्यांची दमछाक होणार आहे.

विभागनिहाय उसाचे गाळप व साखर उतारा टक्केवारीत

विभाग : कोल्हापूर गाळप : १०३.६६ लाख टन उतारा : १०.४२, पुणे १०५.७७ लाख ९.३५, सोलापूर १०५.१५ लाख ८.३८, अहमदनगर ६२.१२ लाख ८.८९, छ. संभाजीनगर ४६.२१ लाख ७.८०, नांदेड ५४.८८ लाख ९.०१, अमरावती ४.२ लाख ८.७९, नागपूर १.२१ लाख ३.४७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com