Smart Villages: ग्राम व्यवस्थापनात वाढेल तंत्रज्ञान वापर

Gram Panchayat Technology: पुढील काही वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण व्यवस्थापनातही होईल.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Digital Gram Panchayat: गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी ही गावात होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या अंमलबजावणीमध्ये ग्रामस्तरावरील अधिकारी जसे की ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कृषी सहायक, तलाठी, पशुवैद्यकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते महत्त्वाचे आहे. या ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांची भूमिका अधिक व्यापक, तांत्रिक आणि प्रभावी होणार आहे. जवळ जवळ गाव पातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांकडे लॅपटॉप व स्मार्ट फोन दिसतील.

ग्रामपंचायतीचे सध्याचे दफ्तर पूर्णपणे डिजिटल होईल. कागदांचा वापर संपुष्टात येईल. ग्रामपंचायतीच्या सर्व सेवा, मालमत्ता कर, बाजार फी, पाणीपट्टी, इत्यादी सर्व ऑनलाइन पद्धतीने जमा केली जाईल. कॅशबुक ऑनलाइन झाल्यास सरपंचांची पंचाईत होईल. मालमत्ता कर अधिक शास्त्रीय पद्धतीने आकारला जाईल. सध्या अनेक सरकारी योजना डिजिटली कार्यान्वित होत आहेत. ग्रामसेवक, कृषी सहायक, आशा वर्कर यांच्याकडे आता मोबाइल अ‍ॅप्स, पोर्टल्स आणि ई-डिव्हाइसेसचा वापर करावा लागतो. पुढील काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण व्यवस्थापनातही होणार आहे.

Rural Development
Grampanchayat Award : पुरस्कार हे गावाचे वैभव

उदा. कृषी सहायक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मातीची माहिती, हवामान अंदाज, आणि योग्य बियाण्यांबाबत तांत्रिक सल्ला देऊ शकतील. आशा वर्कर डिजिटल उपकरणांद्वारे रुग्णांची नोंद, औषध व्यवस्थापन, व लसीकरणाचा मागोवा ठेवू शकतील. यासाठी अधिकाऱ्यांना सतत प्रशिक्षण देणे गरजेचे असेल. गाव पातळीवरील सार्वजनिक जागा, मंदिरे, पाण्याच्या टाक्या, बाजारतळ, ग्रामपंचायत कार्यालय, यांचे डिजिटल नकाशे भूमिअभिलेख कार्यालयाच्या वेबसाइटवर लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल. ग्रामपंचायतीच्या जागेवर गुपचूप अतिक्रमण करून गावापासून लपून राहण्याची कला उघडकीला येईल. प्रशिक्षणाला गेल्यावर आपल्या आवडत्या व्यक्तीचा फोटो लावून हजर राहणे लोकांसाठी अवघड होईल. सरपंच पाणीपट्टी भरतो की नाही हे सगळ्या गावाला कळेल. सर्वांना समान न्याय दिला जातो की नाही याबद्दल तरुण पिढी आग्रही राहील.

‘तळापासून वर’ दृष्टिकोन

ग्रामस्तरावरील कार्यकर्त्यांची पारंपरिक भूमिका म्हणजे योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, माहिती संकलित करणे, आणि जनतेशी संपर्क ठेवणे. परंतु पुढील काळात त्यांची भूमिका केवळ सुविधा पोहोचविणाऱ्या व्यक्तीची न राहता, ती सल्लागार, योजनाकार, मार्गदर्शक, आणि समाजसुधारक अशी बहुपदरी होईल. ग्रामपंचायतीचा आर्थिक आराखडा तयार करताना ग्रामस्थांशी संवाद साधतील. अंगणवाडी सेविका मुलांच्या पोषण स्थितीचे मूल्यांकन करून त्यांच्या पालकांशी संवाद साधतील. तसेच सामाजिक प्रश्‍नांवर (उदा. बालविवाह, स्त्री-शिक्षण, पर्यावरण संरक्षण) स्थानिक पातळीवर चळवळी उभ्या करतील.

Rural Development
Rural Story: हिरव्यागार शिवारात दाटलेला उमाळा

आजवर अनेकदा शासनाचे कार्यक्रम ‘वरून खाली’ पद्धतीने राबवले जातात. पुढील काही वर्षांत ही संकल्पना बदलून ‘तळागाळातून वर’ असा दृष्टिकोन स्वीकारला जाईल. यात ग्रामस्तरावरील अधिकारी हे स्थानिक गरजा समजून घेऊन योजना तयार करण्यात भूमिका निभावतील. उदाहरणार्थ, विशिष्ट गावात पाण्याची समस्या असेल तर तेथे जलसंधारणावर भर दिला जाईल. लोकसहभागातून विकास साधण्यासाठी अधिकारी ग्रामसभा, स्वयंसाह्यता गट, युवक मंडळे यांना सक्रिय करतील

ग्रामस्तरावर काम करणाऱ्या अनेक महिला कार्यकर्त्या आहेत - विशेषतः आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसाह्यता गटांमधील महिला. पुढील काळात या महिलांचे राजकीय, आर्थिक व सामाजिक सशक्तीकरण अधिक बळकट होईल. त्यांच्या माध्यमातून समाजात लैंगिक समानतेचे, महिला आरोग्याचे व शिक्षणाचे महत्त्व अधिक अधोरेखित होईल. ग्रामस्तरावर काम करणाऱ्या विविध विभागांचे कार्य एकमेकांशी समन्वित करणे हे मोठे आव्हान आहे.

पुढील काळात अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचे तंत्र विकसित होईल. सर्व विभाग आरोग्य, शिक्षण, कृषी, महिला व बालविकास एकत्रितपणे योजनांची आखणी करतील. तसेच एकाच गावात विविध अधिकाऱ्यांचे नेटवर्क तयार होऊन, ते समस्या सोडविण्यासाठी संयुक्त उपक्रम राबवतील. उदाहरणार्थ, पोषण अभियान, ग्रामस्वच्छता अभियान, डिजिटल साक्षरता मोहीम इत्यादी.

तंत्रज्ञान, कामाचा भार, अपुरी साधने, राजकीय हस्तक्षेप या समस्या आजही ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांपुढे आहेत. आगामी काळात या अडचणी सोडविण्यासाठी धोरणात्मक पातळीवर बदल करावे लागतील. मतदार याद्या, रेशन कार्ड, पाणीपट्टीचे रजिस्टर, जनगणना, पशू गणना, अशा प्रकारची माहिती घेताना वैयक्तिक ओळख पटविल्याशिवाय माहिती संकलन केले जाणार नाही. त्यामुळे एक गाव बारा भानगडी यांच्यावर बऱ्याच मर्यादा येतील. ग्रामीण भारतामध्ये ग्रामस्तरावरील कार्यकर्त्यांची भूमिका केवळ एका योजनेचा दुवा म्हणून न राहता, तो गावविकासाचा कणा ठरेल. त्यांच्यामुळे गावचा विकास, समाजाचे सशक्तीकरण आणि जनतेचा शासनावरचा विश्‍वास दृढ होईल. त्यामुळे हे कार्यकर्ते ग्रामीण भारताच्या परिवर्तनाचे खरे शिल्पकार ठरतील.

shekharsatbara@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com