Micronutrients Use : जिवाणूजन्य रोगाच्या प्रतिकारतेसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

Unbalanced Nutrition of Crops : बुरशीजन्य रोगांप्रमाणेच पिकांचे असंतुलित पोषण हे जिवाणूजन्य रोगांकरिता कारणीभूत ठरू शकते. जिवाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालाश आणि कॅल्शिअम ही अन्नद्रव्ये महत्त्वाची ठरतात.
Micronutrients Use
Micronutrients UseAgrowon
Published on
Updated on

डॉ. अशोक डंबाळे, रामप्रसाद जोगदंड

बुरशीजन्य रोगांप्रमाणेच पिकांचे असंतुलित पोषण हे जिवाणूजन्य रोगांकरिता कारणीभूत ठरू शकते. जिवाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालाश आणि कॅल्शिअम ही अन्नद्रव्ये महत्त्वाची ठरतात. त्यांच्यामुळे जिवाणूंच्या प्रादुर्भावास भौतिकदृष्ट्या अटकाव (उदा. पेशीभित्तिका मजबूत व जाड होण्यास मदत होते. ज्या वेळी पालाश (पोटॅशिअम), कॅल्शिअम आणि नत्र या अन्नद्रव्यांची पिकांमधील पातळी कमी होते व त्याची कमतरता निर्माण होते, त्या वेळी अशी पिके जिवाणूजन्य रोगांना संवेदनशील होत असल्याचे विविध संशोधनातून पुढे आले आहे.

Micronutrients Use
Micronutrients : रोग प्रतिकारकक्षमता वाढविणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये

पालाश

विविध ठिकाणाच्या संशोधनातून पालाशच्या संतुलित प्रमाणामुळे बुरशी किंवा जीवाणूजन्य रोगांना अटकाव होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आढळलेले आहे. अपायकारक किडींना ६० टक्क्यांपर्यंत प्रतिबंध होत असल्याचे आढळले आहे. शेत जमिनीमध्ये जर डोलोमाइट किंवा मॅग्नेशिअम अधिक वापर केला गेला तर पालाशची कमतरता निर्माण होते. असे पीक कीड व रोगांस संवेदनशील होऊन त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. पिकांचे नुकसान होते.

Micronutrients Use
Micronutrient : सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य, कमतरतेची लक्षणे

बोरॉन

पिकांमध्ये सतत किंवा अधिक कालावधीपर्यंत बोरॉनची कमतरता आढळून येत असल्यास पानांच्या शिरांमध्ये आणि खोडावर खडबडीत किंवा रखरखीत पेशी तयार होतात. बोरॉन कमतरतेमुळे पेशींची वाढ अनियमित होते. या पेशी सर्वसाधारण पेशीप्रमाणे एकत्रित एकसंध न राहता दोन पेशीमध्ये अंतर तयार होते. या रिकाम्या जागेमध्ये अनावश्यक पदार्थ जमा होतात. त्यावर आणि त्याद्वारे जिवाणूंचा पेशीमध्ये शिरकाव होऊ शकतो.

नत्र

नत्राचे प्रमाण संतुलित असेल, तर पाने सुदृढ राहतात. पीक जिवाणुजण्य रोगांना अटकाव करू शकते. नत्राचे प्रमाण अधिक झाल्यास पाने अधिक लुसलुशीत व कोवळी राहून जिवाणूजन्य रोगास संवेदनशीलता वाढते. नत्रची कमतरता असल्यास पेशी मृत होण्याचे प्रमाण वाढते. अशा पेशींवर जगणारे परोपजीवी जीवाणू तिथे वाढतात. त्यांच्या वाढीच्या क्रियेमध्ये अनावश्यक विषारी पदार्थ तयार होऊन पीक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. एकूणच वनस्पतीचे जीवनमान कमी करतात.

डॉ. अशोक डंबाळे, ८७८८०२७४७४

(सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, कृषी महाविद्यालय, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पंजाब.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com