Micronutrient : सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य, कमतरतेची लक्षणे

Micronutrient Function : पीक वाढीमध्ये मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांच्या बरोबरीने सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील महत्त्वाची असतात. प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्याचे कार्य, कमतरतेची लक्षणे ही वेगवेगळी असतात.
Micronutrient
MicronutrientAgrowon
Published on
Updated on

डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. सय्यद इस्माईल

Micronutrients Deficiency Symptoms : पीक वाढीमध्ये मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांच्या बरोबरीने सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील महत्त्वाची असतात. प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्याचे कार्य, कमतरतेची लक्षणे ही वेगवेगळी असतात. कमतरतेची लक्षणे ओळखून योग्य सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्‍यक असते.

लोह

वनस्पतीमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी मदत.

विविध संप्रेरकांचा घटक असल्यामुळे वनस्पतीतील श्‍वसन प्रक्रिया आणि प्रकाश संश्‍लेषण या सर्व प्रक्रिया वनस्पतीची वाढ व पुनरुत्पादनासाठी आवश्यक.

वनस्पतीतील प्रथिने निर्मितीच्या प्रक्रियेत आवश्यक.

लोह हा वनस्पतीमध्ये अचल स्थितीत असतो. त्यामुळे लोहाची कमतरता ही कोवळ्या पानांवर प्रकर्षाने जाणवते.

Micronutrient
Micronutrient Management : रब्बी पिकांसाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन

कमतरतेची लक्षणे

नवीन पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो, शिरा हिरव्या राहतात, हरित लवकाची वाढ खुंटते. कोवळ्या पानांची वाढ थांबते.

पाने पांढरी पडून वरील बाजूस वाळतात. पाने पातळ होऊन वाळतात. वनस्पतीमधील प्रथिनांचे प्रमाण कमी होते.

उपाय

०.५ ते १ टक्का तीव्रतेच्या फेरस सल्फेट (हिराकस) द्रावणाची फवारणी करावी.

Micronutrient
Micronutrient Deficiency : सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेवर विशेष उपाययोजना

मँगेनीज

वनस्पतींमध्ये लोहाचे वहन करण्यास मदत, हरितद्रव्य तयार करण्यास उपयुक्त.

वनस्पती पेशीमध्ये ऑक्सिजनशी संयोग पावण्याच्या प्रक्रियेत सहाय्यक म्हणून कार्य करते.

संप्रेरकाचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे वनस्पतीच्या श्‍वसन क्रियेत आणि हरितद्रव्यातील प्रथिने तयार करण्याच्या प्रक्रियेत मदत.

कमतरतेची लक्षणे

नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो.

पानांमध्ये हरितद्रव्य व हरितलवक कमी होते.

पिवळ्या ठिपक्यांचे नंतर पिवळ्या पट्ट्यात रूपांतर होते किंवा जाळीदार शिरांमध्ये करडे डाग पडतात.

उपाय

प्रति हेक्टरी २० ते ३० किलो मॅंगेनीज सल्फेट जमिनीतून द्यावे.

डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६

(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com