Maize Jowar Rate: अमेरिकेची ज्वारी भारताच्या मक्यापेक्षा स्वस्त; आयात खुली करण्याची अमेरिकेची मागणी

US India Agri Trade: भारतामध्ये मका महाग झाल्यामुळे पशुखाद्य उद्योगाचे अर्थकारण डगमगले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका भारताला स्वस्त नाॅन जीएम ज्वारी, इथेनाॅल व डीडीजीएस यांची आयात खुली करण्यासाठी दबाव आणत आहे.
Maize and Jowar
Maize and JowarAgrowon
Published on
Updated on

Pune News: भारतात मक्याचे दर जास्त आहेत. त्यामुळे पशुखाद्य उद्योगाला महाग मका घ्यावा लागतो. महाग मक्यामुळे पशुखाद्य उद्योगाचे अर्थकारण बिघडत आहे. अमेरिकेची नाॅन जीएम (जणुकीय सुधारित नसलेली) ज्वारी भारताच्या मक्यापेक्षा ४० टक्क्क्यांपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेच्या स्वस्त नाॅन जीएम ज्वारी आयातीला परवानगी द्यावी. तसेच अमेरिकेच्या इथेनाॅल आणि डीडीजीएस आयातीला भारताने परवानगी द्यावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे.

अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये द्वीपक्षीय व्यापार कराराविषयी वाटाघाटी सुरु आहेत. या वाटाघाटी करताना अमेरिकेने शेतीमाल आयातीलाही भारताने परवानगी देण्याची मागणी केली आहे. भारताने जीएम पिकांच्या आयातीला चर्चेतून बाहेर ठेवण्याची मागणी केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. तरीही अमेरिकेने काही मागण्या पुढे रेटल्या आहेत. त्यात मक्यासंबंधी दोन मागण्या आहेत. भारताने इथेनाॅल आणि डीडीजीएस आयातीला परवानगी द्यावी, अशी मागणी अमेरिकेने द्वीपक्षीय व्यापारातील वाटाघाटी दरम्यान केली आहे.

Maize and Jowar
Maize Arrival: मलकापुरात मक्याची तीन हजार क्विंटल आवक

भारतात इथेनाॅलला मागणी आहे. भारत सरकारही पेट्रोलमध्ये इथेनाॅल मिश्रणाचे धोरण राबवत आहे. भारताचे २० टक्के इथेनाॅल मिश्रणाचे उद्दीष्ट फेब्रुवारी २०२५ मध्ये साध्य झाले आहे. भारतात इथेनाॅलला मोठी मागणी असल्याचे पाहून अमेरिकेला आपले इथेनाॅल भारताला पाठवायचे आहे. भारताने इथेनाॅल आयात करावी, अशी मागणी अमेरिकेने केली. तसेच डीडीजीएस आयातीलाही परवानगी द्यावी, अशी मागणी अमेरिका करत आहे. 

भारतात मागील दोन वर्षांपासून मक्यापासून इथेनाॅल निर्मितीला प्रोत्साहन मिळाले आहे. मक्याला इथेनाॅल, पशुखाद्य आणि स्टार्च उद्योगाकडून मागणी असल्याने भाव तेजीत आहेत. पण मका इथेनाॅलसाठी वापरल्यानंतर शिल्लक राहणारा अवशेष म्हणजेच डीडीजीएसमुळे सोयापेंडचा उठाव कमी झाला. डीडीजीएस सोयापेंडपेक्षा स्वस्त आहे. आता पुन्हा अमेरिकेचे स्वस्त डीडीजीएस भारतात आयात झाल्यास पुन्हा मका आणि सोयापेंड बाजारावर दबाव येण्याची भीती आहे. त्यामुळे भारत सरकारने हा निर्णय घेऊ नये, अशी मागणी उद्योगांकडून केली जात आहे. 

Maize and Jowar
Jowar Production: ज्वारीच्या घटत्या क्षेत्राबाबत केंद्राला घालणार साकडे : पटेल

अमेरिका एवढ्यावरच थांबली नाही, तर भारतात मक्याचे दर जास्त असल्याने अमेरिकेच्या ज्वारी आयातीला परवानगी देण्याची मागणी अमेरिकेने केली. अमेरिकेचे म्हणणे आहे, भारतात मक्याचे भाव जास्त असल्याने पशुखाद्याचे भाव जास्त आहेत. याचा फटका पशुखाद्य उद्योग आणि पशुपालकांना बसत आहे. भारताने अमेरिकेची नाॅन जीएम ज्वारी घेतली तर पशुखाद्य स्वस्तात उपलब्ध होईल. 

सध्या भारतात मक्याचे दर ३०५ ते ३१० डाॅलर प्रतिटन आहेत. तर अमेरिकेची ज्वार १६० ते १६५ डाॅलर प्रतिटनाने मिळत आहे. म्हणजेच जवळपास ४० ते ४५ टक्के ज्वारी स्वस्त आहे. भारताने अमेरिकेच्या नाॅन जीएम ज्वारी आयातीला परवानगी दिल्याचा फायदा देशातील उद्योग आणि पशुपालकांना होणार आहे. त्यामुळे भारताने ज्वारी आयातीवरील ५० टक्के शुल्क काढावे, अशी मागणीही अमेरिकेने केली.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com