Unseasonal Rain : नांदेडला अवकाळी पावसाचा धुमाकूळ

Crop Damage : पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या कंधार, कुरुळा व येवती मंडळात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Nanded News : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १२) मध्यरात्री कंधार, लोहा, मुखेड, देगलूर नायगाव, बिलोली या तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. इतर तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.

पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या कंधार, कुरुळा व येवती मंडळात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर इतर दहा मंडळात ५० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी २०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : उमरगा तालुक्यात वादळवाऱ्यासह गारपीट

जिल्ह्यात मागील चार दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी-वाऱ्यासह पाऊस होत आहे. भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला होता. यानुसार शुक्रवारी मध्यरात्री जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला.

Crop Damage
Unseasonal Rain : अवकाळीचा धुमाकूळ पश्‍चिम विदर्भात कायम

पावसादरम्यान वादळी वारे वाहू लागल्याने शेतकऱ्यांच्या आंबा, टरबूज, खरबूज, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दरम्यान गुरुवारनंतर शुक्रवारी पावसाचा जोर वाढला. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात झाला. या पावसाचे प्रमाण कंधार, लोहा, देगलूर, बिलोली या तालुक्यात सर्वाधीक असल्याने कंधार ७८.८ मिलिमीटर, कुरुळा ६६.८ मिलिमीटर व मुखेड तालुक्यातील येवती मंडळात ६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान यासोबतच फुलवळ ६४.८ मिलिमीटर, पेठवडज ४७, जाहूर ४४, आंबुलगा ६२.८, बाऱ्हाळी ३९.५, मुक्रमाबाद ४४.८, चांडोळा ४६, जांब ६०.५, मुखेड ५२.८, आदमपूर ४६.३, मरखेड ६१.३, माळेगाव मक्ता ६१.३, माजंरम ४७.८, माळाकोळी ५३, कलंबर ४१, सोनखेड २४, कापशी २३, शाहापूर ३७, हाणेगाव ५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस

नांदेड - १४.२, बिलोली १७.३, मुखेड ५२, कंधार ५९.८, लोहा ३१.३, हदगाव ३.२, देगलूर ४२.९, किनवट २.६, मुदखेड ८.८, हिमायतनगर २.४, माहूर २.७, धर्माबाद ५.२, उमरी १२.१, अर्धापूर ७.२, नायगाव २१.१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com