
Nagpur News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या काळात युनिक फार्मर आयडी मिळणार आहे. शेतकऱ्याचा आधार क्रमांक जोडून त्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक मिळणार आहे. ॲग्रीस्टॅक उपक्रमाच्या माध्यमातून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. या योजनेचा जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी आढावा घेतला.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशातील प्रत्येक नागरिकाचा वेगळा आधार आयडी (क्रमांक) आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याचा एक युनिक फार्मर आयडी तयार केला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या यूनिक फार्मर आयडी आणि त्यांच्या शेतजमिनीला जोडण्याची ( लिंक करण्याची) मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
भविष्यात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ याच युनिक फार्मर आयडीच्या माध्यमातून मिळणार आहे. येत्या काही दिवसांत महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांनी युनिक फार्मर आयडी तयार करून घेण्यात येणार आहे.
ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत तयार होणारे युनिक फार्मर आयडी भविष्यात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेचे अनुदान मिळविणे, किसान क्रेडिट कार्ड बनविणे, पीक विमा काढणे, त्या अंतर्गत परतावा मिळविणे यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरेल.
याशिवाय सरकारने जाहीर केलेली पिकांची नुकसान भरपाई मिळविणे, कृषी विभागाच्या विविध योजना, सेवांचा लाभ मिळविणे, बाजारपेठेची माहिती, कृषी विषयक कामासंदर्भात कृषी तज्ञांचे मार्गदर्शन मिळविणे यासाठी युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे. शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी हे युनिक फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहेत.
लवकरच शिबिरांचे आयोजन
जिल्ह्यात यासंदर्भात शिबिरांचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी आधारशी मोबाइल नंबर लिंक केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर करावेत. जेणेकरून फार्मर आयडी क्रिएट करताना अडचण येणार नाही. यासंदर्भात महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतक-यांनी सहकार्य करावे, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.