
Jalna News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुगल प्लेस्टोअरवरुन ॲप डाऊनलोड करुन शेतकरी ओळखपत्रासाठी आधार क्रमांकाची ‘ॲग्रीस्टॅक’ मोबाईल ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
शासन निर्णयानुसार शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी व शेतकऱ्यांना त्यांचे ओळख क्रमांक देण्याबाबतचे कामकाज मोहीम स्वरूपात राबविण्यात येणार आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ या योजनेत शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार केले जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांचे नाव, त्याच्या जमिनीची माहिती व आधार क्रमांक जोडला जाणार आहे.
राईटस ऑफ रेकॉर्डमध्ये एखादा शेतकरी जमिनीचा मालक असल्याची ओळख राज्य सरकारला पटवून देणार आहे. त्यासाठी तलाठ्याकडे समक्ष जाऊन जमिनीची नोंद केली जाईल. जमिनीचा मालक हा तोच शेतकरी असल्याची खात्री तलाठी हे कोतवालाकडून करतील. नमुद शेतकऱ्यांनी नाव व त्यांची शेती या डेटाबेसचा वापर करण्यात येईल.
शेतकऱ्यांची ओळख पटविणारा आधार क्रमांक हा त्याच्या मालकीच्या शेताशी जोडला जाईल. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतासह एकत्रितरीत्या शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येईल. जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत होणाऱ्या व्यवहारांमध्ये संमती असल्याशिवाय संबंधित शेतकऱ्यांची पडताळणी करता येत नव्हती.
त्यामुळे अनेक गैरव्यवहार होत होते. मात्र आता अधिकार अभिलेखाला आधार जोडल्याने अशा व्यवहाराची माहिती संबंधित शेतकऱ्याला असावी यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून एसएमएसद्वारे ओटीपी दिला जाईल.
हा ओटीपी दिल्यानंतरच व्यवहार पूर्ण होणार आहे. शेतकरी ओळखपत्रासह अधिकार अभिलेखाला आधार जोडणीचे काम तलाठी करणार आहेत. असा या योजनेचा फायदा होईल. आगामी तीन महिन्यात ॲग्रीस्टॅक प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे, असेही ॲग्रीस्टॅक प्रकल्प अंमलबजावणी समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी कळविले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.