Minister Piyush Goyal : गहू, तांदूळ, साखर निर्यातबंदीवरून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे मोठे विधान; म्हणाले, 'सरकारचा कोणताही....'

Rice, Sugar export ban : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी परराष्ट्र धोरणानुसार केंद्र सरकार हे मित्र राष्ट्रांना मदत करत आहे. त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत असून इंडोनेशिया, सेनेगल आणि गॅम्बिया सारख्या देशांना तांदूळ निर्यात करत असल्याचे म्हटलं आहे.
Minister Piyush Goyal
Minister Piyush Goyal Agrowon

Pune News : राज्यातील शेतकरी हे केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी धोरणावर नाराज आहे. तर ही निर्यात बंदी उठवावी अशी मागणी सतत शेतकऱ्यांच्याकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान गहू, तांदूळ आणि साखरेवर देखील निर्यातबंदी घालण्यात आली आहे. यावरून केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. त्यांनी, 'गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्यातबंदी उठवण्याचा कोणत्याही प्रस्तावावर सध्या सरकारकडे नाही. तर तसा कोणताही विचार सरकार करत नसल्याचे' म्हटलं आहे. त्यांनी याबाबत शनिवारी (ता.१३ रोजी) भाष्य केले. तसेच गोयल यांनी, 'गहू आणि साखर आयातीवरून 'कोणतीही योजना किंवा गरज नाही', नसल्याचेही म्हटलं आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्यातबंदी उठवण्यावर भाष्य करताना, देशांतर्गत बाजारपेठेतील वाढणाऱ्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काम करत आहे. तर त्यासाठीच सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातल्याचे म्हटले आहे.

Minister Piyush Goyal
Onion Issue : पियुष गोयल यांच्या सोबतची बैठक निष्फळ ; कांदा कोंडी दिल्लीत सुटणार ?

तसेच "गहू, तांदूळ आणि साखरेवरील निर्यातबंदी उठवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही. आणि भारत गहू आणि साखर आयात करणार नाही असेही गोयल यांनी म्हटलं आहे. देशात गहू मे २०२२, बासमती तांदुळ सोडून इतर तांदूळावर जुलै २०२३ मध्ये निर्यात बंदी घालण्यात आली होती.

सध्या निर्यातबंदीवरून अर्थतज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावर आपल्या तिव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. मात्र काहींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Minister Piyush Goyal
Onion Rate : केंद्र सरकार दोन लाख टन कांद्याची खरेदी करणार; वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची घोषणा

ज्यावेळी मध्यवर्ती बँक या आर्थिक स्थैर्य ठेवण्यासाठी धडपडत आहेत. तर काहिंनी या स्थितीला गुडघेदुखी म्हटलं आहे. तसेच सरकारने ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही विचारात घेऊन तर्कसंगत व्यापार धोरण तयार केले पाहिजे असेही काहींनी मतं व्यक्त केलं आहे.

किरकोळ चलनवाढ ५.६९%वर

सध्या देशात महागाईचा आगबोंड होत आहे. तर सरकारकडून यावर नियंत्रण ठेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान सांख्यिकी आणि कार्यक्रम मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या किरकोळ चलनवाढीचा दर समोर आला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर हा ५.६९% वर पोहचला आहे. जो चार महिन्यात उच्चांकावर पोहचला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com