Onion Issue : पियुष गोयल यांच्या सोबतची बैठक निष्फळ ; कांदा कोंडी दिल्लीत सुटणार ?

Onion trader strike : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाली. मात्र या बैठकांमध्ये तोडगा निघाला नाही.
piyush goyal meeting
piyush goyal meetingAgrowon
Published on
Updated on

Onion Export duty : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रात्री सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहात केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत मंगळवारी (ता. २६) दोन स्वतंत्र बैठका झाल्या. पण तोडगा निघाला नाही. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे २९ सप्टेंबरला बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी दिली. 

piyush goyal meeting
Onion trader strike : कांदा कोंडी कधी फुटणार? लिलाव बंदी कायम ठेवण्यावर नाशकातले व्यापारी ठाम

मंगळवार सकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनातल्या बैठकीत कांदा व्यापाऱ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे केंद्र सरकारशी संबंधित असल्याने पवार यांनी बैठकीतूनच केंद्रीय वाणिज्यमंत्री गोयल यांच्याशी चर्चा केली. या वेळी गोयल हे मुंबईतच असल्याने त्यांनी सायंकाळी या बाबत बैठक घेऊ, असे सांगितल्याने पवार यांच्या दालनातील बैठक आटोपती घेतली.

 त्यानंतर लगेच पणनमंत्री सत्तार यांनी त्यांच्या दालनात स्वतंत्र बैठक घेतली. या वेळी व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे जमा केलेले परवाने कुठल्याही परिस्थितीत देऊ नका, असे निर्देश बाजार समित्यांना दिले. तसेच बाजार बंद ठेवून लासलगाव, कळवण, निफाड, उमराणे, पिंपळगाव (बसवंत), नामपूर येथील व्यापाऱ्यांनी कमी दरात खरेदी केलेला कांदा विक्री केला आहे, अशा तक्रारीही आपल्याकडे आल्याचे सत्तार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत व्यापारी प्रतिनिधींनी ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ बाजार समितीबाहेर कांदा खरेदी करत आहे. शिवाय खरेदी केलेला कांदा परराज्यांतील व्यापाऱ्यांना कमी दराने विकला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जास्त दराने कांदा खरेदी केला तरी ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या दराशी तुलना करताना तो कमी दराने विकावा लागत आहे. त्यामुळे नुकसान होते. केंद्र सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावले असल्याने मोठा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने ही बंदी उठवावी. तसेच बाजार समित्या आकारत असलेला एक रुपयांचा सेस ५० पैसे करावा, अशी मागणीही केली. यावर पवार यांनी राज्य सरकारच्या अखत्यारितील मुद्द्यांवर आपण मार्ग काढू. मात्र केंद्र सरकारशी संबंधित मुद्द्यांबाबत गोयल यांच्याशी चर्चा काढून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.

piyush goyal meeting
Onion Auction Strike : कांदा व्यापाऱ्यांनी केलेल्या मागण्या शेतकऱ्यांच्या फायद्यांच्या आहेत का?

बैठकीला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, पणनमंत्री अब्दुल सत्तार, आमदार हिरामण खोसकर, राहुल अहिर, नितीन पवार, दिलीप बनकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, दूरदृश्य प्रणालीद्वारे कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा पणन महामंडळाचे संचालक केदारी जाधव, उपसंचालक अविनाश देशमुख, ‘नाफेड’चे अधिकारी निखिल पाडदे, ‘नाफेड’ मुंबईचे अधिकारी पुनीत सिंह, लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहसचिव प्रकाश डमावत, सभापती प्रशांत देवरे, देवळा बाजार समितीचे सभापती बापू देवरे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे, यज्ञेश कडासी, नांदगाव, उमराणा, येवला, देवळा, लासलगाव, पिंपळगाव या बाजार समित्यांचे पदाधिकारी, व्यापारी उपस्थित होते.

चाळीवर जाऊन कांदा खरेदी करू : सत्तार

कांदा व्यापारी अचानक संप करून शेतकऱ्यांना वेटीस धरत आहेत. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा सडायला लागला आहे. त्यामुळे आम्ही लवकरच या व्यापाऱ्यांवर निर्बंधासाठी नियमावली करत करू. मनात आला की संप करायचा हे चालणार नाही, असे पणनमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. ‘‘आम्ही मार्केटिंग फेडरेशनला उतरवून कांदा खरेदी करू, त्यामुळे व्यापाऱ्यांनी संप केला तरी शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. केंद्राला कधी कोणता कांदा मार्केटमध्ये उतरवायचा हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ कांदा मार्केटमध्ये उतरवणे बंद करा ही मागणी मान्य होणारी नाही, असेही सत्तार म्हणाले. पीयूष गोयल हे मुंबईत आहेत. त्यांना भेटून ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावी, अशी मागणी करणार आहे. सेसपोटी ५० पैसे घ्यावेत अशीही व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यावरीही मंगळवारी सायंकाळी चर्चा करणार आहोत. व्यापारी हटले नाहीत तर आम्ही मार्केटिंग फेडरेशनमार्फत चाळींवर जाऊन कांदा खरेदी करू, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com