Agriculture Minister Arjun Munda : 'कृषी कमांड आणि कंट्रोल सेंटर'चे उद्घाटन; कृषिमंत्री मुंडा म्हणाले, 'शेतकऱ्यांना प्रगत...'

Agricultural Command and Control Center : केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी शुक्रवार (ता. ०८) कृषी मंत्रालयात 'कृषी कमांड आणि कंट्रोल सेंटर'चे उद्घाटन केले.
Minister Arjun Munda
Minister Arjun MundaAgrowon

Pune News : देशात काहीच दिवसांत लोकसभेच्या निवडणूका लागणार आहे. तर सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना खूश करणाऱ्या अनेक घोषणा केंद्रातील मोदी सरकारकडून केल्या जात आहेत. दरम्यान काही नव्या योजना देखील आणल्या जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी १३ फेब्रुवारी रोजी 'पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजने'ची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत १ कोटी कुटुंबांनांच्या घरांच्या छतावर सौर ऊर्जा संयंत्रे बसविण्यात येणार आहेत. यापाठोपाठ आता कृषी मंत्रालयाने देशातील शेतकऱ्यांसाठी 'कृषी कमांड आणि कंट्रोल सेंटर'चे उद्घाटन केले आहे. याचे उद्घाटन केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी शुक्रवारी (ता. ०८) कृषी मंत्रालयात केले.

यावेळी कृषिमंत्री मुंडा म्हणाले की, मोदी सरकारला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील शेतकऱ्यांना प्रगत करायचे आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण करणे सोपे होईल. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे युग असून हे शेतीसाठी खूप महत्वाचे आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सर्व डिजिटल सेवा 'कृषी कमांड आणि कंट्रोल सेंटर'मध्ये एकत्रितपणे उपलब्ध असतील.

Minister Arjun Munda
Agriculture Minister : कृषिमंत्र्यांकडून हप्तेखोरी करण्यासाठी कायद्याचा धाक, शेतकरी संघटनेचा आरोप

कृषिमंत्री मुंडा म्हणाले, या नवीन उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना आपल्या क्षेत्रातील माहिती उपलब्ध करून देणे आहे. तसेच कृषी क्षेत्रासमोरील खरी आव्हाने कोणती आहेत हे जाणून घेऊन ती सोडवण्यासाठी एक योजना तयार करणे आहे. तर या उपक्रमाद्वारे पिकांची रिअल टाइम डेटा आणि त्याचे विश्लेषण शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.  याचा फायदा कृषी क्षेत्राला आणि देशाला होईल.

कृषी कमांड आणि कंट्रोल सेंटर

तसेच 'कृषी कमांड आणि कंट्रोल सेंटर' सरकारी योजनांचा लाभ घेणेही सोपे होईल असा आशावाद कृषिमंत्री मुंडा यांनी व्यक्त केला. तसेच, डिजिटल कृषीवर काम सुरू असल्यानेच आज एका क्लिकवर करोडो शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचे पैसे पाठवता आले आहेत असे कृषिमंत्री मुंडा यांनी म्हटले आहे. 

यावेळी कृषिमंत्री मुंडा यांनी, 'कृषी कमांड आणि कंट्रोल सेंटर'मुळे कृषी मंत्रालयाकडून कृषी क्षेत्रात केले जाणारे सर्व डिजिटल नवकल्पना पाहता येतील, असे सांगितले. तसेच रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे पीक सर्वेक्षणातून मिळालेली माहिती, माती सर्वेक्षणातून मिळालेला डेटा, हवामान खात्याने दिलेली माहिती, डिजिटल पीक सर्वेक्षणातून मिळालेली माहिती आणि कृषी मॅपरवर उपलब्ध असलेली माहिती यांचे एकाच ठिकाणी विश्लेषणावरून अचूक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तर हे सगळे 'कृषी कमांड आणि कंट्रोल सेंटर'मुळे शक्य होईल असेही कृषिमंत्री मुंडा यांनी म्हटले आहे. 

Minister Arjun Munda
Agriculture Minister : अब्दुल सत्तारांचा अखेर 'करेक्ट कार्यक्रम', कृषी खातं घेतलं काढून

शेतीतील कामात पारदर्शकता

कृषिमंत्री मुंडा यांनी, कृषी कमांड आणि कंट्रोल सेंटर'मुळे एकाच वेळी अनेक माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून अनेक समस्यांचे निराकरण सोपे होईल, असे म्हटले आहे. तसेच सध्याचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे युग असून शेतीसाठी खूप महत्वाचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे कामात पारदर्शकता आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या किमान सरकार-कमाल शासन या मुलभूत मंत्राने देशातील शेतकऱ्यांसाठी काम केले जात असल्याचेही कृषिमंत्री मुंडा म्हणाले.

नवा डिजिटल आयाम 

आज तंत्रज्ञान हे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. याच्या भागीदारीतून शेतकऱ्याला मजबूत करण्याची सरकारची जबाबदारी असून कृषी मंत्रालयाने नवा डिजिटल आयाम जोडला आहे.  या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि लोकांना आणखी मदत करता यावी, असा सरकारचा मानस असल्याचेही कृषिमंत्री मुंडा म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com