Agriculture Minister : अब्दुल सत्तारांचा अखेर 'करेक्ट कार्यक्रम', कृषी खातं घेतलं काढून

Dhananjay Munde : अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषी खाते आता राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे.
abdul sattar
abdul sattaragrowon
Published on
Updated on

State Government : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून युती सरकारबरोबर गेलेल्या अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांचा आज (ता.१४) खातेवाटपाचा कार्यक्रम पार पडला. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आले आहेत. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषी खाते आता राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे.

अब्दुल सत्तार यांच्याकडे आता अल्पसंख्याक खाते देण्यात आले आहे. दरम्यान मागच्या काही महिन्यांपासून अब्दुल सत्तार हे कृषी खात्यासंबंधित विषयांवरून वादग्रस्त ठरले होते. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सत्तार यांच्याकडील कृषी खाते जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. दरम्यान राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर त्यांच्याकडून अखेर खाते काढून घेण्यात आले आहे.

अब्दुल सत्तार यांची आमदारकीही धोक्यात

अब्दुल सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ वेळीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिली असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. २०१४ रोजी खरेदी केलेली जमिनीला, त्याच्या किमतीमध्ये 2019 ला जास्तीची किंमत दाखवण्यात आली आहे.

कृषी केंद्रांवरील छापा प्रकरण पडले महागात

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने अकोल्यात कृषी विभागाच्या कथित पथकाने घातलेल्या छाप्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचाखुलासा सुद्धा ऐकून घेतला नाही.

अकोला येथे कृषी विभागाच्या वतीने काही दिवसांपूर्वी छापे घातले होते. या छाप्यांमध्ये सत्तार यांचे स्वीय सहायक सहभागी असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. तसेच या पथकाने संबंधित बियाणे व्यापाऱ्यांकडून लाच मागितल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

abdul sattar
Abdul Sattar : कृषीमंत्र्यांच्या अडचणीत वाढ ; निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड

मुख्यमंत्री, उपमुख्यांकडे ही असतील खाती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग देण्यात आले आहेत.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com