Grape Farmer Fraud : द्राक्ष उत्पादकांची ३६ लाखांची फसवणूक करणारे दोघे अटकेत

Grape Fraud Update : मायणी (ता. खटाव) परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तब्बल ३६ लाख १८ हजार ८०० रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
Grape Farmer Fraud
Grape Farmer FraudAgrowon

Satara News : मायणी (ता. खटाव) परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या तब्बल ३६ लाख १८ हजार ८०० रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.सलिम सय्यद, (वय ५०, रा. मूळगाव आनंदवल्ली, बजरंग नगर, गंगापूर रोड नाशिक, सध्या रा. राजुरी, जि. नगर), गंगाराम सुखदेव चव्हाण (वय ५६, रा. वसंतविहार, माझीवाडा, ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे.

या बाबत माहिती अशी, की शिवाजी श्यामराव देशमुख (वय ४३, रा. मायणी) यांनी आपल्या चार एकर क्षेत्रांत निर्यातक्षम द्राक्ष बागेची लागवड केली होती. विटा (जि. सांगली) येथील अरमान सेल्स कॉर्पोरेशनचे मालक सलिम सरदार सय्यद (रा. विटा) व पशुपती माळी (रा. सावर्डे, जि. सांगली) यांनी १२० रुपये प्रति किलो प्रमाणे ३३ हजार ४९० किलो द्राक्षांची १० जानेवारी २०२३ ते २० जानेवारी २०२३ या काळात विक्रीसाठी घेऊन गेले.

Grape Farmer Fraud
Grape Farmer Fraud : द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणारे परप्रांतीय ताब्यात

गंगाराम चव्हाण यांच्या सरस्वती इंटरनॅशनल कंपनीस पाठविणार असल्याचे सांगितले. २१ दिवसांनंतर विकलेल्या द्राक्ष मालाचे ४० लाख १८ हजार ८०० रुपये २१ दिवसांनी देतो, असे सांगितले. त्या वेळी त्यांच्यावर विश्‍वास ठेवला.

नंतर सलिम सय्यद यांना २१ दिवसांनी व कालांतराने वेळोवेळी फोन केला असता त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. सय्यद यांनी दोन महिन्यांनी दोन लाख रुपये बँक खात्यावर पाठविले, तसेच शिल्लक रक्कम सरस्वती इंटरनॅशनल कंपनी थोड्या दिवसांत तुम्हाला देईल, असे सांगितले.

त्यानंतर श्री. देशमुख यांनी त्यांना सतत पैशांची मागणी केल्याने त्यांनी भांडुप (मुंबई) येथील कार्यालयात बोलावून पाच लाख रुपयांचे सात धनादेश व तीन लाख रुपयांचा एक धनादेश असे एकूण ३८ लाख रुपयांचे आठ धनादेश दिले. त्या वेळी सदरील धनादेश बँकेत जमा करू का, असे विचारले असता सरस्वती कंपनी तुम्हाला थोड्या दिवसांत पैसे देईल, असे सांगितले.

Grape Farmer Fraud
Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

त्यानंतर कंपनीने आपल्या खात्यावर दोन लाख रुपये पाठविले. उर्वरित रकमेसाठी आपण व्यापारी सय्यद व सरस्वती कंपनीशी सतत संपर्क केल्यानंतर समाधानकारक उत्तर दिले गेले नाही, तसेच संबंधित धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते सरस्वती कंपनीच्या खात्यावर रक्कम नसल्याने चेक वठले नसल्याचे समजले.

याशिवाय अविनाश शिंदे, रवींद्र माळी, अविनाश शिंदे, महादेव सावंत (रा. मायणी), उपेंद्र माळी, सफलकुमार यलमर, सुनील देशमुख, विजय देशमुख, सुनील कदम, (रा. विखळे), सुशांत शिंदे (रा. मोराळे), महेश पवार (रा. वडूज), धनंजय कारंडे, सुहास शेटे, उमेश शेटे (रा. कलेढोण), रामचंद्र सानप (रा. पडळ) यांचाही विश्‍वास संपादन करून द्राक्षे विक्रीस घेऊन त्यांचीही फसवणूक केल्याचे शेतकऱ्यांनी श्री. देशमुख यांना सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सलिम सय्यद व गंगाराम चव्हाण यांना अटक करण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com