Grape Production : धनादेश न वटल्याने द्राक्ष व्यापाऱ्यास दणका

Grape Rate : शेतकरी कष्टाने गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेतात. मात्र काही व्यापारी व निर्यातदार त्यांची फसवणूक करतात.
Grape Production
Grape ProductionAgrowon

Nashik News : शेतकरी कष्टाने गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेतात. मात्र काही व्यापारी व निर्यातदार त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र मनस्तापालाही त्यांना सामोरे जावे लागते.

असाच प्रकार २०१६ मध्ये नळवाडी (ता. दिंडोरी) येथील शेतकऱ्याच्या बाबतीत घडला होता. द्राक्ष खरेदीपोटी व्यापाऱ्याने दिलेला धनादेश न वटल्याने दिंडोरी न्यायालयात खटला दाखल केला होता. न्यायालयाने व्यापाऱ्यास चार महिने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नळवाडी येथील कैलास भिकाजी कांगणे यांनी थॉमसन वाणाची द्राक्ष लागवड आहे. त्यांनी २०१५-१६ वर्षाच्या हंगामात नाशिक येथील द्राक्ष व्यापारी सतीश विश्वासराव पाटील यास द्राक्षमाल दिला होता. साधारणत: सहा लाखांपर्यंतचा हा माल असल्याचे सांगण्यात आले.

त्यापोटी व्यापाराने दोन वेळा पन्नास हजार असे एक लाख रुपये रोख स्वरूपात दिले. तर, उर्वरित रकमेचा धनादेश दिला होता. व्यापाऱ्याने हा माल पुढे व्यापाऱ्यांना दिला होता. द्राक्ष खरेदीपोटी व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिलेला धनादेश बँकेत वटला नव्हता.

अखेर शेतकऱ्याने नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर पुन्हा व्यापाऱ्याने आश्वासन देऊन १ महिना मुदतीचा धनादेश बदलून दिला होता. मात्र तोही वटला नाही. असे तीन वर्षे चालले.

Grape Production
Grape Disease Management : द्राक्षावरील बुरशीजन्य, जिवाणूजन्य करपा रोगाचे व्यवस्थापन

अखेर शेतकऱ्याने २०१९ मध्ये न्यायालयात धाव घेतली. हा धनादेश बँकेतून न वटताच परत आल्याने कांगणे यांनी अॅड. फरहाद खान डी. पठाण यांच्या माध्यमातून पाटील यास नोटीस पाठविली होती. मात्र नोटिशीला उत्तर व्यापाऱ्याने दिले नाही. तसेच नंतर तारखांना व्यापारी येत नसल्याने न्यायालयाने पकड वॉरंट काढले होते.

अखेर चौथ्या वर्षी याप्रकरणी न्यायालयाने निकाल दिला.र चौकशी होऊन दिंडोरी येथील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क-स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ आश्विनी पंडित यांनी पाटील यास ४ महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.

तसेच फिर्यादीस यास द्राक्ष मालाचे ५ लाख रुपये, त्यावर सहा टक्के दराने व्याजाचे १ लाख ८० हजार रुपये व दहा हजार रुपये खर्च दोन महिन्यांच्या आत द्यावेत, असे निकालात स्पष्ट केले आहे.

फसवणूक करणाऱ्या व्यापारी, निर्यातदारांचे धाबे दणाणले

गेल्या काही वर्षात दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी व निर्यातदारांकडून फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. शेतकऱ्यांनी पोलिसात याबाबत अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या. मात्र पुढे काहीच हालचाल नाही.

मात्र, न्यायालयाच्या या निकालामुळे शेतकऱ्याला न्याय मिळाला आहे. त्यामुळे द्राक्ष खरेदी करून शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या व्यापारी व निर्यातदारांचे धाबे दणाणले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com