Sugarcane Crushing : मागील हंगामापेक्षा बारा लाख टन अधिक गाळप

Sugarcane Season : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरू केले होते. सध्या हे सर्वच कारखाने बंद झाल्याने विभागाचा गाळप हंगाम आटोपला आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon

Nanded News : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांनी यंदा गाळप सुरू केले होते. सध्या हे सर्वच कारखाने बंद झाल्याने विभागाचा गाळप हंगाम आटोपला आहे. या कारखान्यांनी एक कोटी १७ लाख ६६ हजार ५४५ टन उसाचे गाळप तर एक कोटी २० लाख ६५ हजार ८७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. मागील वर्षी ३० साखर कारखान्यांनी एक कोटी पाच लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा तुलनेत १२ लाख टन उसाचे गाळप अधिक झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावल यांनी दिली.

Sugar Factory
Sugarcane FRP : पेच थकित ‘एफआरपी’चा!

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील एकूण २९ कारखाने सुरू झाले होते. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर कारखान्याचा समावेश होता. परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यांत दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी तसेच लातूर जिल्ह्यातील सहा सहकारी व पाच खासगी कारखान्यांचा समावेश होता. सध्या विभागातील सर्वच २९ कारखाने बंद झाल्याने विभागाचा गाळप हंगाम आटोपला आहे. या २९ कारखान्यांनी एक कोटी १७ लाख टन उसाचे गाळप, तर एक कोटी २० लाख ६५ हजार ८७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखरेचा सरासरी उतारा १०.२५ टक्के आला असल्याची माहिती रावल यांनी दिली.

तीन वर्षांतील गाळप

२०२२-२०२२ मध्ये २७ कारखांनी एक कोटी ४७ लाख आठ हजार ३४७ टन उसाचे गाळप, एक कोटी ५३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. २०२२-२०२३ मध्ये ३० कारखान्यांनी एक कोटी पाच लाख टन उसाचे गाळप केले होते. तर २०२३-२०२४ मध्ये २९ कारखान्यांनी एक कोटी १७ लाख टन उसाचे गाळप केले आहे.

Sugar Factory
Sugarcane FRP : ‘एफआरपी’ थकविणारे कारखाने कारवाईच्या रडारवर

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन (गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन

नांदेड सहा १९,४७,२३६ १९,४०,५३५

लातूर ११ ४९,४०,७२१ ५२,८०,६१२

परभणी सात ३३,३५,५४५ ३३,०६,८४०

हिंगोली पाच १५,४३,०४२ १५,३७,१००

एकूण २९ ०१,१७,६६,५४५ ०१,२०,६५,०८७

विभागाचा सरासरी साखर उतारा : १०.२५ टक्के

गाळपात आघाडीवरील कारखाने

गंगाखेड शुगर अँड एनर्जी, गंगाखेड ७,८४,७२६ टन

ट्वेन्टीवन शुगर सायखेडा, सोनपेठ ७,५५,७१० टन

जागृती शुगर तळेगाव देवणी, लातूर ७,०२,३१० टन

विलास ससाका निवळी, लातूर ६,८१,१७९ टन

विकासरत्न विलासराव देशमुख ६,६०,८५१ टन

ट्वेन्टीवन शुगर माळवटी, लातूर ६,३०,०१९ टन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com