Sugar Production : ‘कादवा’ साखर कारखान्याकडून ४ लाख क्विंटल साखर उत्पादन

Kadwa Sugar Factory : या वर्षीच्या हंगामात ३ लाख २९ हजार ५८२ टन उसाचे गाळप करुन सरासरी १२.२२ टक्के उतारा मिळवत ४ लाख शंभर क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
Kadwa Sugar Factory
Kadwa Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्ह्यात सहकार क्षेत्रात एकमेव सुरू असलेल्या दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थिती असतानाही गळीत हंगामाची यशस्वी सांगता केली आहे. हंगामात ३ लाख २९ हजार ५८२ टन उसाचे गाळप करुन सरासरी १२.२२ टक्के उतारा मिळवत ४ लाख शंभर क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर इथेनॉल ३ लाख ६३ हजार लिटर व स्पिरीट ३३ लाख लिटर निर्मिती केली आहे.

Kadwa Sugar Factory
Sugar Factory : सोलापूरातील सात कारखान्यांना मिळणार २.८२ कोटींचे व्याज अनुदान

यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळाचे सावट आहे. परिणामी उसाची उपलब्धता कमी असल्याने ऊस तोड मजूर टंचाईने राज्यातील सर्वच कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीतही कादवाने १४२ दिवसात गळीत हंगाम पूर्ण केला असुन गळीत हंगाम सांगता कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे हस्ते गव्हाणीत नारळ टाकून करण्यात आली.

यावेळी बोलताना श्रीराम शेटे यांनी हंगाम यशस्वी यशस्वी केल्याबद्दल ऊस उत्पादक, कामगार, ऊसतोड कामगार,ऊस वाहतूकदार, मालपुरवठादार यांचे आभार मानत पुढील वर्षी जास्तीत जास्त गाळप करण्याचा प्रयत्न राहणार असून सर्वाधिक उतारा राहिल्याने चांगला भाव राहण्याची शक्यता असून जास्तीत जास्त ऊस लागवड करावी व कादवाला ऊस पुरवठा करावा असे आवाहन केले.

Kadwa Sugar Factory
Sugar Production : देशात ३१८ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता

यावेळी युनियन अध्यक्ष भगवान जाधव, कांतीलाल राठोड यांची मनोगते झाली. त्यानंतर सर्व मुकादमांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक विजय खालकर यांनी केले. आभार गंगाधर निखाडे यांनी मानले. यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव बस्ते,संचालक मंडळ, सर्व विभाग खातेप्रमुख, कामगार उपस्थित होते.

सभासदांना सवलतीच्या दरात साखर

कारखान्यातर्फे सभासदांना सवलतीच्या दरात दिली जाणारी साखरेची अंतिम मुदत मंगळवार ३० एप्रिल असून त्यानंतर कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही तरी त्यापूर्वी सभासदांनी अपुर्ण शेअर्स रक्कम पुर्ण भरुन गटकार्यालयाशी संपर्क करुन आपले स्मार्टकार्ड घेवुन जावे व आपली सवलतीच्या दरातील साखर कारखाना कार्यस्थळावरुन घेवून जावी असे आवाहन कादवा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com