Tree Planting : ‘आरबीआय’कडून शेतकरी कंपनी परिसरात वृक्ष लागवड

Environmental Initiative : भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने सामाजिक दायित्व जपत स्थापनेच्या ९० व्या वर्षानिमित्त ९ हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Environmental Initiative
Environmental InitiativeAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने सामाजिक दायित्व जपत स्थापनेच्या ९० व्या वर्षानिमित्त ९ हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गंत वरोरा येथील कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या परिसरात १२५ वृक्षांची लागवड करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

Environmental Initiative
Tree Plantation : ‘एक वृक्ष आईच्या नावाने’ उपक्रमातून होणार वृक्षलागवड

भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने बॅंकेने सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेत वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला आहे. त्याअंतर्गंत पूर्व विदर्भात सुमारे ९ हजारांवर वृक्ष लागवड यानिमित्ताने केली जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील वृक्ष लागवडीची सुरुवात कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या परिसरात करण्यात आली.

Environmental Initiative
Tree Plantation Scheme : अनुदान अपहारप्रकरणी चौकशीचे आदेश

या वेळी रिझर्व्ह बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक पंकज करमणकर, सहाय्यक सर्वेश शहा उपस्थित होते. स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, स्मार्टचे नोडल अकिधारी नंदकुमार घोडमारे, गणेश मादेवार सामाजिक विकास तज्ज्ञ आशिष दुधे, शेगाव मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, कंपनीचे संचालक यशवंत सायरे हिरालाल बघेले, बळीराम डोंगरकर, नितीन टोंगे, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालाजी ढोबे उपस्थित होते.

‘फसवणूक टाळण्यासाठी जागरुक राहा’

बॅंक प्रशासनाकडून बॅंक खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती फोनवरून मागितली जात नाही. याबाबत वारंवार जागरूकता निर्माण करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही अनेक ग्राहक आपली माहिती शेअर करतात. त्यातून त्यांची फसवणूक होते. हे प्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी फसव्या कॉलला बळी पडू नये असे आवाहन आरबीआयच्या वतीने या वेळी करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com