Miyawaki Forest : शिरगावात ‘मेया वाकी’ प्रकल्पातून वृक्ष लागवड

Tree Plantation Method : जपानच्या धर्तीवर खेड तालुक्यातील हा पहिलाच ‘मिया वाकी’ प्रकल्प आहे,’’ अशी माहिती खेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंधळ यांनी दिली.
Miyawaki Tree Plantation
Miyawaki Tree PlantationAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘जपान तंत्रज्ञानाच्या धर्तीवर मिया वकी (अटल घन-वन रोपवन) खेडच्या पश्चिम पट्ट्यातील शिरगाव (ता. खेड) येथे साकारत आहे. प्राथमिक पातळीवर २० गुंठे क्षेत्रावर फळझाडे, औषधी वनस्पती, फुलझाडे तसेच देशी वृक्ष असे तब्बल १०४ प्रकारचे सहा हजार वृक्ष राजगुरुनगर वन विभागाच्या वतीने लावण्यात आले आहेत. जपानच्या धर्तीवर खेड तालुक्यातील हा पहिलाच ‘मिया वाकी’ प्रकल्प आहे,’’ अशी माहिती खेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप रौंधळ यांनी दिली.

Miyawaki Tree Plantation
Miyawaki Forest : मियावाकी जंगलाची सिंदखेडमध्ये उभारणी

वृक्ष लागवडीच्या ‘मिया वाकी’ तंत्रज्ञानाचा जगभर प्रसार केला. याच धर्तीवर वनविभाग जुन्नर अंतर्गत, राजगुरुनगर वनविभाग वनपरिमंडळ टोकावडेमधील शिरगावच्या जंगल परिसरात घाटमाथ्यावर प्राथमिक पातळीवर २० गुंठे क्षेत्रात हे उपवन करण्यात आले आहे. एक मीटरमध्ये दोन फुटांच्या अंतरावर तीन झाडांची लागवड केली आहे.

Miyawaki Tree Plantation
Miyawaki Technology : रत्नागिरी जिल्ह्यात करणार जपानी ‘मियावाकी’ तंत्राचा वापर

या तीन झाडांमध्ये एक मोठा वाढणारा देशी वृक्ष, एक झुडूप वर्गातील तर एक त्यापेक्षा कमी वाढणारे फुलझाड किंवा औषधी वनस्पती लावण्यात आल्या आहेत.

यामध्ये आंबा, उंबर, फणस, शतावरी, गुलाब, दालचिनी, चाफा, ऐन, अर्जुन, साग, महोगणी, पुत्रजिवा, कवठ, चिंच, आनंद चाफा, पारिजातक यांसह अन्य झाडांचा समावेश आहे.

झाडांच्या वाढीसाठी नैसर्गिक खतांचा वापर

‘‘झाडांची वाढ उत्तमपणे होण्यासाठी रोपांच्या लागवडीपूर्वी जमिनीची नांगरणी करून त्यामध्ये शेणखत, पालापाचोळा, सेंद्रिय व नैसर्गिक खतांचा वापर करण्यात आला आहे. झाडांच्या संरक्षणासाठी परिसराला संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे’’, अशी माहिती वनपाल चेतन नलावडे, वनरक्षक अंकुश गुट्टे, गोकूळ बंगाळ यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com