Tree Plantation : ‘एक वृक्ष आईच्या नावाने’ उपक्रमातून होणार वृक्षलागवड

Forest and Social Forestry Department : ‘एक वृक्ष आईच्या नावाने’ या संकल्पनेतून वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने यंदा वृक्षलागवड केली जाणार आहे.
Tree Plantation
Tree PlantationAgrowon

Nagar News : ‘एक वृक्ष आईच्या नावाने’ या संकल्पनेतून वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने यंदा वृक्षलागवड केली जाणार आहे. वन महोत्सवाचे नाव आता अमृतवृक्ष आपल्या दारी केले आहे. स्थानिक प्रजातीच्या रोपे लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. शासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या असून वन महोत्सवात रोपांचे दरही कमी केले आहेत. यापुढे झाडाच्या संवर्धनाबाबतचा तपशील ठेवणे बंधनकारक केले आहे.

वन महोत्सव दर वर्षी साजरा केला जातो. शासकीय विभागांना वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. अनेक विभागातील वृक्षलागवड ही फोटो सेशन करून त्याच खड्ड्यात वृक्ष लावण्यापुरती मर्यादित राहात होती. वन विभागाने या बनवेगिरीला ब्रेक लावण्यासाठी या वर्षापासून लागवड केलेल्या वृक्षांचे आणि संवर्धनाबाबत तीन वर्षे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधनकारक केले आहे. .

Tree Plantation
Tree Plantation : दहा लाख झाडे लावणार

वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सव राबविला जातो. शासकीय विभागांना ही वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिलेले असते. या कार्यालयाचे प्रमुख वृक्षलागवडीचे फोटो काढून वरिष्ठ कार्यालयास पाठवितात. काही कार्यालयाचे वृक्षारोपण दर वर्षी एकाच खड्ड्यात केले जाते. शासकीय कार्यालयांना मोठ्या प्रमाणात रोपे मोफत दिली जातात.

Tree Plantation
Tree Plantation Scheme : अनुदान अपहारप्रकरणी चौकशीचे आदेश

या रोपांचे योग्य संवर्धन न केल्याने उन्हाळ्यात ही रोपे जळून जात होते. सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांना सवलतीच्या दरात रोपे पुरविली जातात. वन महोत्सवाच्या काळात रोपे खरेदी करण्यासाठी दर निश्चित केले असून सर्वसाधारणपेक्षा कमी दर आहेत. वन विभागाकडून आता ज्या शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालयांना मोफत रोपे दिली आहेत.

स्थानिक प्रजातीची रोपे

वन विभागाच्या उपसंचालक सुवर्णा माने यांनी सांगितले, की वन विभागाने स्थानिक प्रजातीची रोपे लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात नीम, आवळा, जांभूळ, सीताफळ, वड, पिंपळ, बहावा, खैर ही रोपे तयार केली आहेत. शासकीय कार्यालय, शिक्षण संस्था, शेतकरी, नागरिक यांना वन विभागाकडून रोपे लागवडीसाठी पैसे भरून पावती घ्यावी लागत होती. यंदा वन विभागाच्या वतीने स्टॉल सुरू केले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com