Tree Plantation Scheme : अनुदान अपहारप्रकरणी चौकशीचे आदेश

Tree Plantation Subsidy : राज्य सरकारने राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार मंगळवेढा येथील सामाजिक वनीकरण विभागाने २०१७ ते २०२३ दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केल्याचे दाखविले आहे.
Tree Plantation
Tree PlantationAgrowon

Pandharpur News : राज्य सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत मंगळवेढा येथील सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी मंगळवेढा न्यायालयात दाखल केली होती.

या प्रकरणी आता येथील न्यायालयाने मंगळवेढा पोलिसांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या चौकशी आदेशामुळे सामाजिक वनीकरण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.\

Tree Plantation
Tree Name To Home : मान्याच्यावाडीतील घरांना झाडांची नावे

राज्य सरकारने राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार मंगळवेढा येथील सामाजिक वनीकरण विभागाने २०१७ ते २०२३ दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केल्याचे दाखविले आहे.

३३ कोटी वृक्ष लागवड योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार दादासाहेब चव्हाण यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने शेवटी श्री. चव्हाण यांनी येथील सामाजिक वनीकरण विभागातील एक अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन बोगस मजूर दाखवून १४ कोटी ६० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार २१ सप्टेंबर २०२३ रोजी मंगळवेढा येथील न्यायालयात दाखल केली होती.

Tree Plantation
Tree Plantation : वृक्षारोपणासाठी ‘मनरेगा’सह ‘टॉप अप मॉडेल’ राबविणार

त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. देवर्षी यांनी याप्रकरणी १५६ कलमा अन्वये चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मंगळवेढा पोलिसांना दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सामाजिक वनीकरण विभागाचे वनअधिकारी एच. एस. वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या संदर्भातील कोणतीही माहिती कार्यालयाकडे आली नाही. या बाबत चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com