Sugarcane Transporter Strike : ऊसतोड मजूर, मुकादमांना दरवाढ न दिल्यास वाहतूकदारांचा संप

Sugarcane Season : सध्या राज्यातील ऊसतोड मजुरांना ३४ टक्के दरवाढ, तर मुकादमांना १ टक्के दरवाढ देण्याचा निर्णय झाला आहे.
Sugarcane Transport
Sugarcane Transport Agrowon

Sangli News : सध्या राज्यातील ऊसतोड मजुरांना ३४ टक्के दरवाढ, तर मुकादमांना १ टक्के दरवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. वाढत्या महागाईमुळे ऊस वाहतूकदारांना सध्याच्या दरामुळे साखर कारखान्यांना ऊस पाठविणे अडचणीचे झाले आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊस वाहतूकदारांना ५५ टक्के वाहतूक व कमिशन दरवाढ १५ दिवसांत द्यावी, अन्यथा दोन्ही राज्यांतील ऊस वाहतूकदारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

तासगाव येथे रविवारी (ता. ७) स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेची बैठक झाली. या वेळी केंपवाड कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी बंडू जगताप यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, नागेश मोहिते यांनी ऊस वाहतूकदारांचे प्रश्न मांडले.

Sugarcane Transport
Sugarcane Transporter : ऊस वाहतूकदारांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करू

सुकाणू समितीचे प्रमुख संदीप राजोबा म्हणाले, की वाढती महागाई, डिझेल, वाहनदुरुस्ती, ऑईल, टायर्स, मजुरांना द्यावा लागणार जास्तीचा ॲडव्हान्स व त्यावरील व्याज, तसेच दुरुस्तीसाठी मिस्त्री, पंक्चरवाला यांना द्याव्या लागणाऱ्या मजुरीसह अन्य व्यवसायांसाठी लागणाऱ्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणात महागल्याने ऊस वाहतूकदार अडचणीत आलेत.

Sugarcane Transport
Sugarcane Transport Crime : ऊस वाहतूकदारांना फसवलेल्या ठेकेदारांवर कारवाई, पोलिसांची १६ पथके रवाना

ऊस वाहतूकदारांना ५५ टक्के वाढ द्यावी, याबाबत संघटना साखर संघ व राज्य सरकार व साखर कारखानदारांकडे मागणी करणार असून पंधरा दिवसांत निर्णय न झाल्यास महाराष्ट्र व कर्नाटकतील ऊस वाहतूकदार स्वयंस्फूर्तीने संपावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला विठ्ठल पाटील, विनोद पाटील, संदीप मगदूम, श्रीकृष्ण पाटील, गणेश गावडे, पी. एम. पाटील, विजय पाटील, केतन मिठारी, नामदेव पवार, सुनील माने व ऊस वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com