Election Process : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य : उपायुक्त हिर्देशकुमार

Deputy Commissioner of Election Commission : निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांनी निवडणूक यंत्रणांना दिले.

Election
Shirol Assembly Election : कारखानदार विरुद्ध शेतकरी संघटना; शिरोळची जनता कोणाला देणार साथ

स्थानिक स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक बुधवारी (ता. ६) पार पडली.

Election
Donald Trump Won US Election : अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार!, कमला हॅरिस पराभूत

या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, संजयकुमार, अभिलाष कुमार, अनिलकुमार, अविनाशकुमार तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता जपा

प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवित असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्यांचे शंकानिरसन करावे, असे हिर्देशकुमार यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com