
Nashik News : सर्वसाधारणपणे स्पर्धेच्या युगात बाजारात शेतकऱ्यांचे ब्रॅण्ड टिकविण्यासाठी प्रशिक्षण गरजेचे असते. अलीकडेच आदिवासी वित्त व विकास महामंडळाने शबरी नॅचरल्स ही ब्रॅण्ड नावाने उत्पादने आणली आहे. त्यांची गुणवत्ता टिकविणे आपल्या हातात आहे, असे प्रतिपादन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी केले आहे.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या संकल्पनेतून शबरी नॅचरल्ससाठी काम करत असलेल्या कृषी उत्पादक संस्थांचे चार दिवसीय प्रशिक्षण शिबिर सह्याद्री फार्म्स (मोहाडी, ता. दिंडोरी) येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्रात बनसोड यांनी मार्गदर्शन केले.
बनसोड म्हणाल्या, की आदिवासी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य असून आकार देणे आवश्यक आहे. आदिवासी बांधवांच्या कलाकृतीमधूनच शबरी नॅचरल्स हा ब्रॅण्ड विकसित झाला आहे. या ब्रॅण्डच्या माध्यमातून राज्यभरातील आदिवासी बांधवांचे गुणवत्तापूर्ण उत्पादने एकाच धाग्यात गुंफली जात आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून या उत्पादनांना मागणी ओळखावी व उत्पादनांच्या गुणवत्तेत तडजोड करता येणार नाही.
क्षमता बांधणीसंबंधी सल्लागार शेषराव ससाणे यांनी प्रशिक्षण सत्राचे महत्त्व पटवून दिले. प्रशिक्षण सत्रामध्ये मार्केटिंग संधी या विषयावर हरीश बाविस्कर, रिसोर्स मॅनेजमेंटचे महत्त्व या विषयावर तुषार जगताप, उत्पादन क्षेत्रामध्ये दळणवळणाचे नियोजन या विषयावर तुषार नांदगावकर, उत्पादनांचे पॅकेजिंग आणि कच्चा माल या विषयावर श्रीकांत कुलकर्णी, चैतन्य सोनार यांनी मार्गदर्शन केले.
तसेच ऋतुजा म्हस्के, राधिका गायकवाड, अमोल गोडजे, चेतन चौधरी यांनी उत्पादन प्रक्रियेतील विविध विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण सत्रासाठी शबरी महामंडळाचे वरिष्ठ सल्लागार प्रशांत ब्राह्मणकर, सह्याद्री फार्म्सचे प्रमोद राजेभोसले, सुरेश नखाते, नवनाथ जाधव यांचे सहकार्य लाभले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.