Election Training : घनसावंगीत १७७२ कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण

Maharashtra Assembly Election 2024 : सदरील प्रशिक्षण वर्गास मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी निहाय कर्तव्य व जबाबदारींचे सूक्ष्म मार्गदर्शन पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले.
Election Training
Election Training Agrowon
Published on
Updated on

Jalna News : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण सोमवारी (ता. ११) व मंगळवारी (ता. १२) तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, राजेगाव रोड, घनसावंगी येथे झाले. यामध्ये दोन दिवसांत १७७२ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

सदरील प्रशिक्षण वर्गास मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी निहाय कर्तव्य व जबाबदारींचे सूक्ष्म मार्गदर्शन पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ च्या कलमान्वये मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

Election Training
Maharashtra Election 2024 : लोकशाही बळकटीकरणासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करावे

निवडणूक आयोगाच्या प्रतिनियुक्तीवर असल्याबाबतची जाण करून देण्यात आली. मतदान प्रक्रियेतील असलेले महत्त्वाचे टप्प्यांबाबत माहिती, साहित्य वाटप, मतदान पूर्व, मतदानादरम्यान, मतदान संपल्यानंतरच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणे, निवडणूक साहित्य स्वीकृती व तपासणी करणे, ईव्हीएम तपासणी, व्हीव्हीपॅट संबंधी माहिती, चिन्हांकित फोटो मतदार यादी,

Election Training
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानासाठी १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

मतदानाच्या आदल्या दिवशी करावयाची तयारी, मतदान केंद्रावर करावयाच्या बाबी, निवडणूक कायद्याची अंमलबजावणी, मॉकपोल बाबतचा फ्लो चार्ट, मतदानासंबंधीची गुप्तता, मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, महत्त्वाचे अहवाल, नमूने तयार करणे तसेच या निवडणुकीमध्ये काही नवीन बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

जे मतदार प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदान करून शकत नाहीत, त्यामध्ये ८० वर्षांवरील ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार, कोविड-१९ संबंधित मतदार, अत्यावश्यक सेवा पुरविणारे मतदार यांच्यासाठी टपाली मतपत्रिकेद्वारे त्यांचे मतदान करून घेण्याबाबत सविस्तर माहिती मनीषा दांडगे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, अंबड यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com