Drowning Accident Nashik : शेततळ्यात बुडून माय-लेकाचा मृत्यू

Farm Pond Accident News : शेततळ्याजवळ अंघोळीसाठी गेलेला मुलगा बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत थेट आईनेही पाण्यात उडी मारली.
Drowning Accident
Drowning Accident Agrowon
Published on
Updated on

Nashik News : शेततळ्याजवळ अंघोळीसाठी गेलेला मुलगा बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत थेट आईनेही पाण्यात उडी मारली. मात्र, त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने आडवाडी गावावर शोककळा पसरली आहे. अलका गणेश बिन्नर (वय ३५), साईनाथ गणेश बिन्नर (१३) अशी मृत माय-लेकरांची नावे आहेत. लक्ष्मण भवानी बिन्नर यांच्या शेततळ्यात ही घटना घडली.

साईनाथ आणि त्याची बहीण आरोही (१०) हे दुपारी एकच्या सुमारास शेततळ्याजवळ खेळत होते. तेव्हा साईनाथ अंघोळीसाठी शेततळ्याकडे जाऊ लागला. आरोहीने त्यास विरोध केला, मात्र तरीही साईनाथ शेततळ्यात उतरला, पण लागलीच तो गटांगळ्या खाऊ लागल्याने आरोहीने त्यास वाचविण्यासाठी शेततळ्याजवळ असलेला ड्रीपचा पाइप फेकला.

Drowning Accident
Farmer Accident Insurance : सांगलीतील १७२ शेतकऱ्यांना ‘शेतकरी अपघात विमा’चा फायदा

परंतु, तो साईनाथपर्यंत पोहोचला नाही. आरोही लगेचच घराकडे पळत आली. तिने आई अलका यांना घटनेबाबत सांगितले. दोघीही धावत शेततळ्याकडे आल्या. अलका यांनी अंगावरील साडी काढून ती साईनाथकडे पाण्यात फेकली. परंतु, साडीही त्याच्यापर्यंत पोहोचत नव्हती. अखेर साईनाथची तडफड पाहून त्यांनी स्वतःच शेततळ्यात उडी मारली. यात साईनाथसह त्याची आई अलका यांचा बुडून मृत्यू झाला.

Drowning Accident
Mumbai Train Accident: अपघाताला रेल्वे विभाग जबाबदार; चौकशीनंतर योग्य कारवाई : अजित पवार

आरोही हिने आरडाओरड करून वस्तीवरील नागरिकांना बोलावले. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. घटनेबाबत पोलिसपाटील गुलाब बिन्नर यांना माहिती देण्यात आली. त्यांनी शेततळ्याकडे धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना पाण्याबाहेर काढले व तातडीने सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. विच्छेदनानंतर मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पत्नी-मुलाच्या वियोगाने धक्का

साईनाथ हा त्र्यंबकेश्वर येथे वारकरी शिक्षण घेत होता. त्याच्यासह यंदा आरोहीलाही त्याच शाळेत प्रवेश घेतला जाणार होता. त्यासाठी वडील गणेश बिन्नर हे त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. दोघांचेही प्रवेश पक्के केले. दोन दिवसांत त्यांना शाळेत पाठविणार होते, मात्र घटना कळताच त्यांनी हंबरडा फोडला. पत्नी आणि मुलाच्या वियोगाने त्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com