Mumbai Train Accident: अपघाताला रेल्वे विभाग जबाबदार; चौकशीनंतर योग्य कारवाई : अजित पवार
Pune News: मुंबईत आज (ता.९) सकाळी ९ वाजता मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळ लोकल रेल्वेचा अपघात झाला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागावर असून, चौकशीनंतर योग्य त्या गोष्टींवर कारवाई केली जाईल. मुंबईची लोकल रेल्वे दर दोन-तीन मिनिटांनी सतत धावत असते, त्यामुळे या यंत्रणेवर मोठा ताण असतो. यात स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची रुंदी मर्यादित असून तितकेच डब्बे दिले जात आहेत. तरीही, रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी मेट्रो प्रवासाला प्राधान्य दिले जात असल्याचं पवार यांनी सांगितलं.
मुंबईची लोकल प्रवाशांना ने-आण करण्यासाठी महत्त्वाची यंत्रणा असून, रेल्वे मंत्रालय सातत्याने त्यात सुधारणा करत आहे. ब्रिटीशकालीन काळातील पूल खराब झाले होते, त्यात बदल व सुधारणा करण्यात आल्या आहेत. परंतू आज झालेली ही दुर्घटना दुर्दैवी असून, मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना संबंधित विभागाकडून मदत जाहीर केली जाईल, असंही अजित पवारांनी जाहीर केलं.
तसेच, पुढील काळात प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायक होण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील आणि रेल्वे विभागाकडून कोणत्या सुधारणा केल्या जातील, याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, लोकलमधील प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. या वेळी समोरुन आलेल्या रेल्वेतील प्रवाश्यांचा एकमेकांना धक्का लागल्यामुळे हा अपघात झाला. या घटनास्थळी अपघातात रेल्वेच्या रुळावर काही प्रवासी खाली पडले होते. ज्यात चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका जीआरपी (Government Railway Police) पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे. तर उरलेल्या काही जखमी प्रवाश्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, जखमींमध्ये दोन प्रवाशांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात एकूण सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.