Tractor Sale Growth: ट्रॅक्टर विक्रीला मिळाला मॉन्सूनचा ‘बूस्ट’

Monsoon Impact: देशातील शेतकऱ्यांना मॉन्सूनचा योग्य पाऊस मिळाल्यामुळे २०२४-२५ मध्ये ट्रॅक्टर विक्रीत ८ टक्क्यांची वाढ झाली आहे.
Tractor
TractorAgrowon
Published on
Updated on

Pune News: देशातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात पावसाने साथ दिली. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत ८ टक्के वाढ झाली आहे. तसेच ट्रॅक्टरच्या निर्यातीसह उत्पादनात वाढ झाली आहे, असे ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

खरिपात मॉन्सूनच्या पावसाने साथ दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ चांगली झाली. देशातील बहुतांश जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे रब्बी हंगामात पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीला पसंती दिली. परंतु देशातील प्रमुख शेतीमालाच्या पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी आता पाहायला मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरचे हप्ते लांबणीवर पडल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Tractor
Tractor Market In India : देशात ट्रॅक्टर विक्रीत ८ टक्के वाढ; शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदीला पसंती

देशातील २०२३-२४ या आर्थिक वर्षात मॉन्सूनने साथ दिली नव्हती. त्यामुळे ट्रॅक्टरची विक्री ८ टक्क्यांनी घटली होती. परंतु २०२४-२५ मध्ये मॉन्सूनमध्ये पावसाने दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे उत्पादकता काहीशी सुधारली. परिणामी सणांच्या काळात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीला पसंती दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच देशातील ट्रॅक्टर उद्योगाच्या निर्यातीसह उत्पादनात वाढ झाली आहे. मागील वर्षी देशांतर्गत ट्रॅक्टरच्या उत्पादनात २२ टक्के घट झाली होती. परंतु यंदा मात्र १० लाख ट्रॅक्टर उत्पादनाचा टप्पा उद्योगाने ओलांडला आहे.

देशांतर्गत ट्रॅक्टरची विक्री आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ८ लाख ६७ हजार २३७ युनिट्सवर होती. परंतु आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मात्र ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री ९ लाख ३९ हजार ७१३ युनिट्सवर पोहोचली आहे. मागील १० वर्षांच्या तुलनेत २०२५ मध्ये देशाच्या पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागातील जलाशयात पाणीसाठा चांगला राहिला. तसेच रब्बीच्या सुरुवातीला ‘ला निना’ला पोषक स्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी टॅक्टर खरेदीकडे मोर्चा वळवला. परिणामी २०२५ च्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहीमध्ये ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ पाहायला मिळाली होती.

Tractor
Tractor sales increase : २०२५ च्या चौथ्या तिमाहीत ट्रॅक्टरची विक्री वाढली

मार्चमध्ये सणांच्या मुहूर्तावर ट्रॅक्टरच्या खरेदीला शेतकऱ्यांनी पसंती दिली. मार्चमध्ये ७९ हजार ९४६ ट्रॅक्टर युनिटची विक्री झाली. मागील वर्षी याच कालावधीत केवळ ६३ हजार ७५५ युनिटची विक्री झाली होती. त्यामुळे ट्रॅक्टर विक्रीत वाढीचे चित्र पाहायला मिळाले. तसेच देशात आगामी मॉन्सून हंगामात सरासरी १०३ टक्के पावसाचे संकेत स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिले आहेत. त्याचाही ट्रॅक्टरच्या विक्रीला आधार मिळू शकतो. त्यामुळे पुढील काळात ट्रॅक्टरची मागणी कायम राहील, असा विश्वास उद्योगाकडून व्यक्त केला जात आहे.

निर्यात पोहोचली ९८ हजार युनिटवर

ट्रॅक्टरची निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत काहीशी सुधारली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ९७ हजार ८२८ ट्रॅक्टर युनिटची निर्यात झाली होती. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मात्र ट्रॅक्टर निर्यात ९८ हजार ८१३ युनिटच्या घरात पोहोचली आहे. तर एकूण ट्रॅक्टर उत्पादन मागील वर्षीच्या ९ लाख ४७ हजार १४३ युनिटवरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये १० लाख ७ हजार ६६० युनिटवर पोहोचले आहे.

परंतु २०२३ च्या तुलनेत मात्र उत्पादनात घट झाली आहे. दरम्यान, राज्यात खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या प्रमुख शेतीमालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला. त्यामुळे मॉन्सून हंगामात पावसाने साथ देऊनही कमी उत्पन्नामुळे खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे हप्ते थकले, असल्याचे राज्यातील शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com