Painganga Tiger Project : पैनगंगा अभयारण्य व्याघ्र प्रकल्पाच्या हालचालींना वेग ; वनमंत्र्यांकडून हिरवी झेंडी
Yavatmal News : यवतमाळ : पैनगंगा अभयारण्यास व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा द्या, अशी मागणी आमदार किसन वानखेडे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. याला वनमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविल्याने हालचालींना वेग आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये पसरलेल्या पैनगंगा अभयारण्यास व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे वनमंत्री यांच्यामार्फत केली आहे. वनमंत्री यांनी या विषयी तत्काळ अहवाल हा वन सचिवाकडे मागितला आहे. हे अभयारण्य हे जैव विविधतेने समृद्ध असून वाघ, बिबट्या, सांबर, चितळ, विविध पक्षी व वनस्पती प्रजातींचे आश्रयस्थान आहे.
तसेच हे अभयारण्य ताडोबा-अंधारी व नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा एक महत्त्वाचा वन्यजीव कॉरिडॉर आहे.पैनगंगा अभयारण्य हे भौगोलिक दृष्टिकोनातून ताडोबा आणि पेंच प्रकल्पांपेक्षा मोठे असून नैसर्गिकदृष्ट्या याचे महत्त्व अधिक असल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पाचा दर्जा दिल्यास, वन्यजीव संवर्धनासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
‘वाघांचे संरक्षण अधिक प्रभावी होईल’
व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिल्यासः वाघांचे संरक्षण अधिक प्रभावी होईल. पर्यावरणीय संतुलन राखले जाईल, केंद्र व राज्य शासनाकडून विशेष निधी प्राप्त होईल, स्थानिक पर्यटन व रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील, विविध जैव विविधतेच्या संवर्धनाला बळ मिळेल.
अनेक वेळा येथे वाघांचे अस्तित्वही नोंदविले गेले आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाची गरज अधिक ठळकपणे जाणवते. या बाबीकडे सकारात्मक विचार करून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार किसन वानखेडे यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.