Rare Plants In Sindhudurg: सिंधुदुर्गात आढळल्या तीन दुर्मीळ वनस्पती

Maharashtra Biodiversity: येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय पैठणे आणि दोन विद्यार्थिनींना जिल्ह्यात चिकट मत्स्याक्षी, भुईचाफा, ‘गाठी तुळस’ (रान तुळस) अशा तीन दुर्मीळ वनस्पती आढळून आल्या आहेत.
Rare Plants In Sindhudurg
Rare Plants In SindhudurgAgrowon
Published on
Updated on

एकनाथ पवार

Sindhudurg News: येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय पैठणे आणि दोन विद्यार्थिनींना जिल्ह्यात चिकट मत्स्याक्षी, भुईचाफा, ‘गाठी तुळस’ (रान तुळस) अशा तीन दुर्मीळ वनस्पती आढळून आल्या आहेत. त्या वनस्पतींची नोंद वनस्पती संशोधन संस्थेकडे केली आहे. २५ वर्षांनंतर या वनस्पती आढळून आल्याने जिल्ह्याच्या वनसंपदेत मोठी भर पडली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. आतापर्यंत १२०० हून अधिक वनस्पतींची नोंद झालेली आहे. परंतु आता त्यामध्ये नव्याने तीन दुर्मीळ वनस्पतींची भर पडणार आहे. वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. पैठणे, विद्यार्थिनी सारिका बाणे, योगेश्री केळकर यांनी

Rare Plants In Sindhudurg
Rare Paddy Variety : शिराळा तालुक्यात सुधारित, दुर्मीळ भात वाणांची प्रात्यक्षिके

भुईचाफा (Kaemferia rotunda L.) चिकट मत्स्याक्षी, Staurogyne glutinosa (Wall. ex C.B.Clarke) Kuntze, ‘गाठी तुळस’ (रान तुळस) Hyptis capitata Harley या तीन दुर्मीळ वनस्पती शोधल्या आहेत. २०१५ पासून ते विविध वनस्पतींचा शोध घेत होते. 

Rare Plants In Sindhudurg
Rare Trees Species : दुर्मीळ वृक्ष रोपनिर्मितीचा घेतलाय वसा

भुईचाफा ही वनस्पती सारिका हिला शिवडाव (ता.कणकवली) येथे आढळली, तर योगेश्री  हिला चिकट मत्स्याक्षी वनस्पती सोनाळी (ता.वैभववाडी) येथे आढळून आली. या दुर्मीळ वनस्पतींची राज्यात यापूर्वी नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. 

गाठी तुळस ही वनस्पती अर्थात रानतुळस ही कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे पैठणे यांना आढळून आली. यापूर्वी या वनस्पतीची नोंद फक्त अंदमान-निकोबार, केरळ, त्रिपुरा, पश्‍चिम बंगाल आणि गोवा (मोलेम नॅशनल पार्क) येथे होती.

महाराष्ट्राच्या वनसंपदेत या प्रजातीची ही पहिली नोंद ठरली आहे. या तीनही वनस्पतींची नोंद विविध वनस्पती संशोधन संस्थेकडे २०२४ आणि २०२५ मध्ये करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com