Rare Trees Species : दुर्मीळ वृक्ष रोपनिर्मितीचा घेतलाय वसा

Women's Day 2025 : गेल्या काही वर्षांत पश्चिम घाट आणि कोकणपट्टीतील गर्द हिरवाई कमी होत चालली आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दुर्मीळ वृक्ष प्रजाती नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत.
Rare Tree Species Conservation
Rare Tree Species Conservation Agrowon
Published on
Updated on

Women's Community Forestry : गेल्या काही वर्षांत पश्चिम घाट आणि कोकणपट्टीतील गर्द हिरवाई कमी होत चालली आहे. महत्त्वाचे म्हणजे काही दुर्मीळ वृक्ष प्रजाती नष्ट होण्याच्या स्थितीत आहेत. पश्चिम घाटातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम पशू, पक्षी आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होताना दिसत आहे.

जैवविविधतेचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी तसेच दुर्मीळ वृक्षांच्या संवर्धनासाठी अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाउंडेशन (एईआरएफ) या स्वयंसेवी संस्थेने साडवली (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे दहा वर्षांपूर्वी रोपवाटिकेला सुरुवात केली. महत्त्वाचे म्हणजे या रोपवाटिकेचे व्यवस्थापन महिला करतात.

Rare Tree Species Conservation
Women Entrepreneurship Development : संपदा प्रकल्पातून महिलांना मिळाली दिशा

या उपक्रमाबाबत ‘एईआरएफ’च्या संचालिका डॉ. अर्चना गोडबोले म्हणाल्या, की आमची संस्था गेल्या तीस वर्षांपासून पश्चिम घाट आणि कोकणपट्टीतील खासगी जंगल, देवराई आणि कांदळवन संवर्धन, संरक्षणामध्ये कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांतील सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की, पश्चिम घाट, कोकणपट्टीतील प्रदेशनिष्ठ दुर्मीळ वृक्ष अमर्याद तोडीमुळे नष्ट होत आहेत. या बहूपयोगी वृक्षांचे संवर्धन जैवविविधता, पशू,पक्ष्यांचा अधिवास टिकविण्यासाठी महत्त्वाचे असल्याने दहा वर्षांपूर्वी साडवली (जि. रत्नागिरी) येथे संस्थेच्या प्रक्षेत्रावर स्थानिक, प्रदेशनिष्ठ आणि दुर्मीळ वृक्षांच्या रोपनिर्मितीस सुरुवात केली.

यामध्ये आम्ही मद्दामहून महिलांचा सहभाग घेतला आहे. रोपवाटिकेत तीसहून अधिक प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची निर्मिती होते. रोपवाटिकेतून दरवर्षी सुमारे दहा हजारांहून अधिक रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतात. रोपवाटिकेमध्ये प्रामुख्याने दासवण,कडू कवठ, शिसम, अर्जून, रिंगी, सीतेचा अशोक, करंज, बिवळा, जांभूळ, फणस, आंबा, हिरडा, बेहडा,वड, पिंपळ, बहावा आदी दुर्मीळ देशी वृक्ष तसेच खारफुटीच्या रोपांची निर्मिती होते.

रोपवाटिकेच्या माध्यमातून सात महिलांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे. रोपवाटिका प्रक्षेत्रावर विविध स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, महाविद्यालयाचे विद्यार्थी भेट देऊन प्रशिक्षण घेतात, रोपांची खरेदी करतात.

आम्ही झाडांची काळजी घेणाऱ्या लोकांना मागणीनुसार प्राधान्याने दुर्मीळ वृक्षांची रोपे देतो. दरवर्षी रोपवाटिकेत तयार झालेली रोपे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात संस्थेच्या कार्यक्षेत्रातील दीडशे गावशिवारातील देवराई तसेच जंगल परिसरात लोकसहभागातून लावली जातात. रोपांची योग्य देखभाल केल्याने त्यांची चांगली वाढ झाली आहे.

Rare Tree Species Conservation
Women Entrepreneurship: नाविन्यपूर्ण उपक्रमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना नवी बाजारपेठ!

राज्य - परराज्यांतही विस्तार

रोपनिर्मितीबरोबरीने विविध बचत गटातील महिलांना संस्थेतर्फे रोप निर्मिती, व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिले जाते. याचे चांगले परिणाम दिसत आहेत. संस्थेच्या माध्यमातून बोपोली (जि. रायगड) येथील महिला गटाने स्थानिक कंद मुळांची रोपवाटिका तयार केली आहे. छत्तीसगडमधील कान्हा आणि मांदरी या गावातील दोन बचत गटांच्या माध्यमातून ४० महिलांनी एकत्र येत दुर्मीळ देशी वृक्षांची रोपवाटिका तयार केली आहे. यातून गावपातळीवर महिलांना रोजगाराची चांगली संधी तयार झाली आहे.

साक्षीच्या हाती रोपवाटिकेचे नियोजन

संस्थेच्या साडवली येथील रोपवाटिकेची जबाबदारी कोसुंब (जि. रत्नागिरी) गावातील साक्षी माने ही पहाते. याबाबत साक्षी म्हणाली, की मी गेल्या दोन वर्षांपासून रोपवाटिकेचे नियोजन करत आहे. रोपांसाठी पिशव्या भरणे, खतमिश्रण, बियाणे पेरणी, रोपांना पाणी देणे, कीडनाशकांची फवारणी आदी कामांचे नियोजन करते.

शेतकरी, महिला गट तसेच विद्यार्थांना विविध रोप निर्मिती आणि त्यांच्या गुणधर्माबाबत माहिती देते. हंगामानुसार जंगलातील दुर्मीळ वृक्षांच्या बिया गोळा करून रोपवाटिकेत रोपे तयार करते. रोप लागवडीनंतर यांचे संवर्धन आणि संगोपन आम्ही सर्वजण करत असल्याने जैवविविधता टिकण्यास मदत होत आहे.

- एईआरएफ संस्था, पुणे ८६६८८७५०३७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com