Rare Paddy Variety : शिराळा तालुक्यात सुधारित, दुर्मीळ भात वाणांची प्रात्यक्षिके

Paddy Farming : मोगरा, लाल घाटी पंकज हे लाल तांदळातील वाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चालू वर्षापासून शेतकऱ्यांना लागवडीखाली देण्यात आले आहे.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये कृषी विभाग, चांदोली कोयना शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी बचत गटांच्या संयुक्त विद्यमाने सोनवडे, चरण, चिंचेवाडी, मणदूर, गुढे या गावामध्ये सुधारित व दुर्मीळ भातवाणांची प्रात्यक्षिके सुरू आहेत. कृषी विभागामार्फत चालू हंगामामध्ये हेक्टरी १०० क्विंटल उत्पादनचे उद्दिष्ट ठेवून मोहीम राबविण्यात येत आहे.

तालुक्यामध्ये प्रथमच वाण निवड या बाबींवर लक्ष केंद्रित करून कोकण कृषी विद्यापीठ शिरगाव संशोधन केंद्राचे बासमती प्रकारातील कोकण सुवास हे वाण लागवडीखाली आणण्यात येत आहे. मोगरा, लाल घाटी पंकज हे लाल तांदळातील वाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चालू वर्षापासून शेतकऱ्यांना लागवडीखाली देण्यात आले आहे.

Paddy Farming
Paddy Rate : ठोकळ धान वाणाचे दर दर्जाअभावी आले दबावात

वडगाव मावळ संशोधन केंद्राने विकसित केलेले इंद्रायणी पायाभूत हे शुद्ध बियाणे प्रात्यक्षिकामध्ये घेण्यात येत आहेत. स्थानिक वाणातून देखील जिल्हास्तरावर पीकस्पर्धेत अधिक उत्पादन घेऊन क्रमांक आलेले आहेत. उत्पादनाबरोबरच आरोग्यवर्धक असल्याने या संदर्भातील मार्गदर्शन व लागवड चालू आहे.

Paddy Farming
Paddy Bonus : दीड लाखावर धान उत्पादकांना मिळणार १८० कोटींचा बोनस

कोकण कृषी विद्यापीठ दापोली संशोधित कोकण सुवास, रत्ना ७, रत्ना ८, रत्ना१ तर वडगाव मावळ संशोधन केंद्रातील पायाभूत इंद्रायणी, फुले कोलम याचबरोबर दुर्मिळवाणांमध्ये वालय, मोगरा, लाल घाटी पंकज, काळा नमक, गोविंद भोग, रक्त शाळा, शिराळ दोडगा, जोंधळा या वाणांची बियाणे चांदोली कोयना उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात आली आहेत. मात्र सकाळी प्रात्यक्षिक आणि दुपारी पाऊस असा खेळ सुरू झाला आहे. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com