Medicinal Plant Subsidy : औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी अनुदान सुरू

Herbal Farming Grant : ‘औषधी व सुगंधी वनस्पती लागवड’ हा घटक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात यंदा नव्यानेच समाविष्ट करण्याचे संकेत केंद्र शासनाने दिले होते.
Herbal Plant Subsidy
Herbal Plant SubsidyAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी बंद करण्यात आलेले अनुदान पूर्ववत चालू ठेवण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अनुदान मागणी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

‘औषधी व सुगंधी वनस्पती लागवड’ हा घटक एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात यंदा नव्यानेच समाविष्ट करण्याचे संकेत केंद्र शासनाने दिले होते. त्यामुळे लागवडीसाठी निश्चित किती अनुदान मिळणार, याविषयी उत्सुकता लागून होती.

फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी सांगितले की, राज्यात २०१५ ते २०२० या पाच वर्षात ‘औषधी व सुगंधी वनस्पती लागवड’ यासाठी अनुदान योजना चालू होती. त्यामुळे शेतकऱ्यांना चार कोटींहून अधिक रक्कम वाटण्यात आली.

यातून ८१८ हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड झाली. मात्र, २०२१ पासून योजना बंद झाली होती. अलीकडेच योजना पुन्हा सुरू झाल्याने आता शेतकऱ्यांना लागवड खर्चाच्या ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. यामुळे लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.

Herbal Plant Subsidy
Panpimpali Farming : औषधी वनस्पती पानपिंपळीला हवा राजाश्रय

ज्येष्ठ मध, शतावरी, कालीहारी, सफेद मुसळी, गुग्गूळ, मंजिष्ठा, कुटकी, अतिस, जटामासी, अश्वगंधा, ब्राम्ही, तुलसी, विदारीकंद, पिंपळी, चिराटा, पुष्करमूळ या औषधी वनस्पतीची लागवड शेतकऱ्यांना अनुदानातून करता येईल. त्यासाठी शासनाने लागवड खर्च प्रतिहेक्टर दीड लाख रुपये लाख गृहीत धरीत या खर्चाच्या ४० टक्के अनुदान दोन हेक्टरपर्यंत सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

अधिसूचित क्षेत्रात हेच अनुदान ५० टक्के राहील. गुलाब, रोझमेरी, निशिगंध, जिरेनियम, कॅमोमाईल, चंदन, दवणा, जाई, लॅव्हेंडर अशा महाग गटातील सुगंधी वनस्पतीच्या लागवडीसाठीदेखील अनुदान मिळेल. त्यासाठी सव्वा लाखाचा लागवड खर्च गृहीत धरून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ४० टक्के तर अधिसूचित क्षेत्रात ५० टक्के अनुदान वाटले जाणार आहे.

Herbal Plant Subsidy
Training Program : विवरा येथे औषधी, सुगंधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण

पामरोसा, गवती चहा, तुळस, व्हेटिव्हर, जावा, सिट्रोनेला, गोड तुळशीपत्र लागवडीसाठी देखील ४० टक्के अनुदान मिळणार आहे. त्यासाठी लागवड खर्च प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये गृहीत धरण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी येथे करावा अर्ज

शेतकऱ्यांना यातील कोणत्याही वनस्पतीच्या लागवडीसाठी अनुदान हवे असल्यास mahadbtmahait.gov.in येथे महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा लागेल, असे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाने म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com