Team Agrowon
यंदाच्या ऊस गाळप हंगामात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ९४४ लाख टन उसाचं गाळप केलं आहे.
त्यातून ९५.२९ लाख टन साखरेचं उत्पादन झालं. गेल्यावर्षी याच कालावधीत २११ साखर कारखान्यांनी ९९८.१७ लाख टन उसाचं गाळप केलं होतं.
त्यातून ९९.१२ लाख टन साखरेचं उत्पादन झालं होतं. हंगामाच्या सुरुवातीला साखर उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
पण आता मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळीमुळे साखर उत्पादनात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. चालू हंगामात राज्यातील २०६ साखर कारखाने सुरू होतं.
त्यापैकी मार्चच्या शेवटी २२ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. गेल्यावर्षीच्या मार्चच्या तुलनेत ४ टक्के साखर उत्पादनात घट आल्याचं दिसतं.
पण अजून गाळप हंगाम सुरू आहे. केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर बंधनं घातलेली आहेत. तसेच इथेनॉल निर्मितीकडे साखर वळवण्यासाठी निर्बंध घातलेली आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा एफआरपी थकवला आहे.