Crop Loan : रब्बी हंगामात तेराशे कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Rabi Season : यंदाच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात ७८२ कोटी ३ लाख रुपये व हिंगोली जिल्ह्यात ५१८ कोटी १९ लाख रुपये असे दोन जिल्ह्यात मिळून एकूण १ हजार ३०० कोटी २२ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : यंदाच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात ७८२ कोटी ३ लाख रुपये व हिंगोली जिल्ह्यात ५१८ कोटी १९ लाख रुपये असे दोन जिल्ह्यात मिळून एकूण १ हजार ३०० कोटी २२ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.

या दोन जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ४५ कोटी ७ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी, ग्रामीण, खासगी मिळून एकूण १७ बँकांना ७८२ कोटी ३ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात राष्ट्रीयकृत (व्यापारी) बँकांना एकूण ४४४ कोटी ९ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १७२ कोटी ९२ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण ग्रामीण बँकेला १०७ कोटी १६ लाख रुपये, खासगी बँकांना ५७ कोटी ८६ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे.

Crop Loan
Mahatma Phule Crop Loan Scheme : पीक कर्ज परतफेड केली; आम्हालाही लाभ द्या, वंचित शेतकऱ्यांची मागणी

गतवर्षीच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात व्यापारी बँकांना ४२२ कोटी ८ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी १६१ कोटी ९१ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०६ कोटी २१ लाख रुपये असे एकूण ७४४ कोटी ८३ लाख हजार रुपये उद्दिष्ट होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पिककर्जाच्या उद्दिष्टात ३७ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

Crop Loan
Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदाच्या रब्बी हंगामात विविध बँकांना ५१८ कोटी १९ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ११४ कोटी ८१ लाख रुपये, व्यापारी बँकांना २९४ कोटी १५ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०९ कोटी २३ लाख रुपये उद्दिष्टांचा समावेश आहे.

गतवर्षी (२०२३-२४) च्या रब्बी हंगामात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ११३ कोटी ४७ लाख रुपये, राष्ट्रीयीकृत (व्यापारी) बँकांना २८९ कोटी ५० लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला १०७ कोटी ३५ लाख रुपये असे एकूण ५१० कोटी ३२ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पीककर्ज वाटपाच्या उद्दिष्टात ७ कोटी ८७ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com