Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

Kharif Loan : खानदेशात पीककर्ज वितरण खरिपासाठी सुरू आहे. परंतु राष्ट्रीय बँका हे कर्ज देण्यासंबंधी हात आखडता घेत आहेत.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पीककर्ज वितरण खरिपासाठी सुरू आहे. परंतु राष्ट्रीय बँका हे कर्ज देण्यासंबंधी हात आखडता घेत आहेत. जिल्हा बँकांनी मात्र आपले पीककर्ज वितरण गतीने केले आहे. धुळे-नंदुरबार जिल्हा बँक, जळगाव जिल्हा बँकेने खरिपासाठी पीककर्ज वितरण लक्ष्यांक निश्चितीनंतर प्रस्ताव वेगात स्वीकारले व कर्ज वितरण सुरू केले.

जळगाव जिल्हा बँकेला यंदा सुमारे एक हजार ५० कोटी रुपये पीककर्ज वितरण सप्टेंबर २०२४ पर्यंत करायचे होते. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेने सुमारे २४१ कोटी रुपये पीककर्ज वितरण केले. या दोन्ही बँकांनी लक्ष्यांकातील १०० टक्के पीककर्ज वितरण जवळपास पूर्ण केले आहे. मेमध्येच या बँकांनी ६० टक्क्यांवर पीक कर्जाचे वितरण केले. जळगाव जिल्हा बँकेने एक लाख ९० हजार शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करून लक्ष्यांक गाठल्याची माहिती आहे

Crop Loan
Crop Loan : नाशिक जिल्हा बँकेकडून ६०० कोटींवर पीककर्ज

खानदेशात राष्ट्रीय बँकांनी पीककर्ज वितरण संथ गतीने केले आहे. मागील वेळेस रब्बीतही ६० टक्केच पीक कर्ज वितरण झाले होते. गेल्या खरिपातही गती संथ राहिली. पीककर्ज वितरण प्रशासनाने निश्चित केलेल्या लक्ष्यांकाएवढे झालेले नाही, अशी स्थिती आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण तीन हजार कोटी रुपये पीककर्ज वितरण अपेक्षित होते.

तर धुळे-नंदुरबारमध्ये मिळून सुमारे १४०० कोटी रुपये पीककर्ज वितरण अपेक्षित होते. नंदुरबारमध्ये स्टेट बँक अग्रणी बँक आहे. जळगावात सेंट्रल बँक अग्रणी बँक आहे. परंतु या दोन्ही जिल्ह्यांत राष्ट्रीय बँकांकडून सातत्याने राष्ट्रीय बँकांना व अन्य बँकांना पीककर्ज वितरणाबाबत आवाहन करण्यात आले. परंतु कार्यवाही गतीने झाली नाही.

Crop Loan
Crop Loan : अद्यापही दोन बँकांकडून एक रुपयाचेही पीककर्ज नाही

तसेच अनेक शेतकऱ्यांचे नवे पीककर्ज प्रस्ताव बँकांत पडून आहेत. त्यावर प्रशासन कार्यवाही करीत नसल्याने अडचणी आहेत. नव्या प्रस्तावासाठी जमिनीचे मूल्यपत्रही मागितले जात आहे. तसेच सर्च रिपोर्ट व अन्य माहितीही बँका मागत आहेत. मोठा खर्च येत असून, १५ ते २० दिवस वणवण फिरून हे काम कसेबसे पूर्ण होत आहे. यानंतर बँका पीककर्ज प्रस्ताव स्वीकारत आहेत. पीककर्ज देताना फक्त सात-बारा, आठ-अ आणि अलीकडच्या दोन वर्षांतील फेरफार नोंदीच मागण्याचा अधिकार बँकाना असावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

सिबिल स्कोअर, रिपोर्टची तपासणी

राष्ट्रीय व खासगी बँका पीककर्ज देताना शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर व सिबिल रिपोर्ट तपासत आहेत. सिबिल रिपोर्टमध्ये शेतकऱ्याने अन्य बँकांकडून पीककर्ज घेतले आहे का, फेरफार नोंदी व अन्य माहिती तपासून सिबिल रिपोर्ट तयार केला जात आहे. परंतु पीककर्ज देताना काही बँका सिबिल स्कोअरला अधिकचे महत्त्व न देता शेतकऱ्यांना सहकार्य करीत असल्याचेही चित्र आहे. परंतु काही खासगी बँका, राष्ट्रीय बँका सिबिल स्कोअरची अट घालून शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारात असल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com