Nashik News : आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गत दहा वर्षांत पीक कर्ज वाटपाचा आलेख घसरला आहे. नोटाबंदीनंतर साधारण २०१६-१७ या आर्थिक वर्षांपासून पीककर्ज वाटपाचे प्रमाण सातत्याने कमी झाले आहे.
जिल्हा बँकेने यंदा केवळ ६२८.०६ कोटींचे कर्ज वाटप केले आहेत. यातही रब्बी हंगामासाठी केवळ ३१.७० कोटींचे वाटप केले आहे. वसुली थकल्याने परवाना वाचविण्यासाठी बँकेचा प्रयत्न सुरू आहे. आशिया खंडात नाशिक जिल्हा बँक सर्वाधिक पीक कर्ज वाटप करणारी बँक म्हणून ओळखली जात होती.
महाराष्ट्रात नावलौकीक असलेल्या जिल्हा बँकेच्या यादीत या बँकेचा समावेश होता. मात्र, आर्थिक अडचणीत सापडल्यापासून बँकेचा पीक कर्ज पुरवठा आलेख दिवसेंदिवस कमी झाला आहे. प्रामुख्याने वसुली थकल्याने पीक कर्ज वाटपावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. बँकेची सद्यःस्थितीत २३०० ते २४०० (मुद्दल व व्याजासह) कोटीच्या आसपास अंदाजे कर्ज थकबाकी आहे.
कर्ज वसुली करू नये यासाठी सततचे होत असलेल्या शेतकरी आंदोलनांमुळे बँकेची वसुली ठप्प आहे. वाढत्या थकबाकीमुळे जिल्ह्यातील वि. का. सहकारी संस्था व पर्यायाने बँकेच्या एन. पी. ए. वाढला. वाढत जाणाऱ्या एन. पी. ए. ची व वसुल न होणाऱ्या व्याजाची आर. बी. आय.चे धोरणाप्रमाणे बँकेस दरवर्षी तरतूद करावी लागल्यामुळे बँकेचा तोटा दरवर्षी वाढत चालला आहे.
रब्बी कर्जवाटपात मोठी घट
जिल्हा बँकेकडून खरीप व रब्बी या दोन हंगामासाठी पीककर्ज वाटप होते. यात खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप नियमित आहे अपवाद २०१७-१८ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षात पीककर्ज घटले होते. खरिपाच्या तुलनेत रब्बी हंगामातील पीककर्ज वाटप दहा वर्षात घटले आहे.
गत ११ वर्षांतील झालेले पीक कर्ज वितरण
सन झालेले खरीप-रब्बी पीककर्ज वाटप (कोटी रुपये)
२०१४-१५ १२५४.८४
२०१५-१६ १२९४.३९
२०१६-१७ १७१९.१८
२०१७-१८ २१२.७३
२०१८-१९ ३२६.५०
२०१९-२० १९९.३८
२०२०-२१ ४८२.८१
२०२१-२२ ४६७.१६
२०२२-२३ ४६३.९९
२०२३-२४ ४५९.८९
२०२४-२५ ६२८.०६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.