Animal Husbandry Transfers: ‘पशुसंवर्धन’च्या बदल्यांमध्ये अन्याय होणार नाही: मुंडे

Minister Pankaja Munde: पशुसंवर्धन विभागातील बदल्यांमध्ये अधिकाऱ्यांना समान अधिकार देऊन समुपदेशानुसार बदल्या होणार असून कोणावरही अन्याय होणार नाही, अशी स्पष्ट माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Pankaja Munde
Pankaja Munde Agrowon
Published on
Updated on

Pune News: पशुसंवर्धन विभागातील ज्या अधिकाऱ्यांची पत, ऐपत आणि आमदार, खासदारांच्या ओळखी आहेत अशाच अधिकाऱ्यांच्या मागेल तिथे बदल्या होत होत्या. मात्र आता सर्वांना समान अधिकार मिळणार असून, समुपदेशाने बदल्या होणार आहेत. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही.

तसेच बदल्यांचा हा पॅटर्न कायम ठेवणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (ता. १५) पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी पशुसंवर्धन सचिव रामास्वामी, आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे उपस्थित होते.

Pankaja Munde
Animal Husbandry Scheme : पशुसंवर्धनातून अर्थार्जनाची संधी

या वेळी मंत्री मुंडे म्हणाल्या, ‘‘पशुसंवर्धन विभागातील वर्ग १ च्या बदल्या समुपदेशाने करण्यासाठी गुरुवारी (ता. १५) कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये ऑनलाइन पद्धतीने आणि शासनाच्या धोरणानुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात आला होता.

यामध्ये प्रथम दिव्यांग, असक्षम, दुर्धर आजार, विधवा, परित्यक्ता, पती-पत्नी एकत्रीकरण, आई-वडील, सासू-सासरे यांचे आजार आदी प्राधान्यक्रम ठरविण्यात आले होते. यामध्ये बदलीपात्र अधिकाऱ्यांचे समुपदेशन करून सुमारे ५५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे काही अधिकाऱ्यांनी दुर्गम आदिवासी भागात बदली मागितली होती.’’

Pankaja Munde
Pankaja Munde: गोवंश हत्याबंदी कायदा बळकट करणार: पंकजा मुंडे

लवकरच नवीन योजना

पशुसंवर्धन हा विभाग ग्रामीण आणि शहरी भागाशी निगडित विभाग आहे. तसेच हा विभाग उद्योजकांचा विभाग आहे. यामध्ये डेअरी, फिशरी, गोटरी, पोल्ट्री आदी व्यवसायांचा संबंध येतो. मात्र तरीही हा विभाग जरासा दुर्लक्षित आहे. हा विभाग जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावा, ग्रामीण भागात उद्यमशील व्हावा यासाठी लवकरच योजना आणणार आहोत. या योजनेचा मसुदा तयार असून, याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांना झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ही योजना जाहीर केली जाईल, अशी माहिती मंत्री मुंडे यांनी दिली.

‘सल्ला देण्यासाठी मी लहान’

काही कुटुंबे राजकारणामुळे दुभंगली आहेत. ती एकत्र येण्याबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर बोलताना मंत्री मुंडे म्हणाल्या, ‘‘मी सर्वच राजकीय पक्ष घराण्यांच्या जवळ आहे. माझे वडील स्व. गोपिनाथ मुंडे यांची ही पुण्याई आहे. मात्र आता कोणी एकत्र यावे न यावे या बाबत मी कोणाला सल्ला देण्याइतपत माझे वय नाही. सर्व जण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित राहावे एवढीच अपेक्षा आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com