Animal Husbandry Scheme : पशुसंवर्धनातून अर्थार्जनाची संधी

Government Scheme : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन तसेच शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

Raigad News : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकऱ्यांना स्वयंरोजगाराचे साधन तसेच शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

यासाठी ऑनलाइन पद्धतीने १ जूनपर्यंत अर्ज स्‍वीकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रायगड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी केले आहे.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबत संपूर्ण तपशील https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच AH-MAHABMS मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्‍वीकारले जातील.

या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाइप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वतःच्या मोबाइलचा जास्तीत जास्त वापर करावा.

Animal Care
Animal Husbandry Scheme : ‘पशुसंवर्धन’ योजनेतून व्याज सवलत

अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेअंतर्गत आपला मोबाइल क्रमांक बदलू नये व गतवर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.

एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर दरवर्षी अर्ज करावा लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पाच वर्षांपर्यंत म्हणजे २०२५-२६पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. अर्जदार पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.

Animal Care
Animal Husbandry Scheme : पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याला सुरुवात

येथे मिळेल अधिक माहिती

योजनेबाबत १९६२ या टोल फ्री क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधल्यास माहिती मिळू शकेल.

अशा आहेत योजना

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप, शेळी-मेंढी गट वाटप, १,००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप असा लाभ दिला जातो. या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया २०२५-२६ या वर्षात राबविली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com