Water Shortage : तीनशे गावांमध्ये पाणीटंचाईची छाया

गेल्यावर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती बिकट झाली होती. जवळपास ६३९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली होती.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Amravati News : जिल्ह्यातील जवळपास ३०० गावांना यंदा पाणीटंचाईच्या (Water Shortage) झळा सोसाव्या लागणार आहेत.

विशेष म्हणजे, यंदा उत्तम झालेला पावसाळा तसेच जलजीवन मिशनच्या (Jaljeevan Mission) झालेल्या कामांमुळे मागील वर्षीपेक्षा टंचाईग्रस्त गावांची ही संख्या निम्म्यावर जाण्याचा दावा पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.

गेल्यावर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती बिकट झाली होती. जवळपास ६३९ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली होती. अनेक गावांमध्ये तर वेळेवर उपाययोजना घेण्यात आल्या.

यंदा मात्र पावसाळा दमदार झाला असून जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे हाती घेण्यात आल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या घटण्याचे संकेत आहेत.

Water Shortage
उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासणार 

यंदा जवळपास ३०० गावांमध्ये टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता गृहीत धरून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

जलजीवन मिशनअंतर्गत चिखलदरा, धारणी व अन्य तालुक्यांमध्ये पाण्याच्या टाक्या, पाण्याची टाकी ते घरापर्यंत पाइपलाइन टाकणे, अशी अनेक कामे करण्यात आली आहे.

यंदा चिखलदरा तालुक्यातील बहुतांश तसेच अचलपूर, चांदरबाजार, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांतील काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

अचलपूर, चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांना केवळ बोअरच्या पाण्याची उपलब्धता आहे. उन्हाळ्यात या गावांनासुद्धा टँकरवर अवलंबून राहावे लागणार आहे.

Water Shortage
Water Management : पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्याची ‘जलव्यवस्थान’ची सूचना

या तालुक्यांचे अहवाल झाले प्राप्त

अमरावती, चिखलदरा, धारणी, दर्यापूर, धामणगावरेल्वे या पाच तालुक्यांकडूनच केवळ संभाव्य पाणीटंचाईची गावे तसेच प्रस्तावित उपाययोजनांबाबतचे अहवाल प्राप्त झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com