Water Level : इगतपुरीत पाणीपातळी खालावली

Water Issue : पाण्याअभावी पिकेही सुकू लागली आहेत. तालुोक्यातील लहान-मोठ्या धरणांची पाणीपातळी खालावल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Water Level
Water LevelAgrowon

Igatpuri News : इगतपुरी तालुक्यात उन्हाळ्याची कोरडी छाया नागरिकांची तडफड वाढवत आहे. पाण्याचा ठणठणाट जीवघेणा बनू लागला आहे. सावली नाही, चारा नाही, तहान भागवायला पाणी नाही अशी परिस्थिती मुक्या जनावरांवर येऊन ठेपली आहे. पाण्याअभावी पिकेही सुकू लागली आहेत. तालुोक्यातील लहान-मोठ्या धरणांची पाणीपातळी खालावल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दारणा धरण २४.६५, मुकणे ३०.८३, वाकी ४३.५४, भाम २३.५३, भावली १३.११, कडवा २५.१० असा जलसाठा धरणात शिल्लक आहे. आतापासूनच धरणाच्या तालुक्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात पिण्याचे पाणी व चाराटंचाईवर अद्याप नियोजन झालेले नाही.

Water Level
Water Stock : रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीसाठा १.६६ दलघमीने घटला

राजकीय नेते उदासीन आहेत. प्रश्‍नांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. पाणी बचतीसाठी कठोर धोरण अवलंबावे लागणार आहे. तालुक्यातील पशुधन वाचविण्यासाठी उपयोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. तापमानामुळे मका पिकाचा पालापाचोळा झाला आहे. पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यावाचून होरपळत आहे.

Water Level
Water Resources : नांदेडला खासगी जलस्रोतांचे अधिग्रहण

तसेच, पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करीत आहे. तर दिवसेंदिवस वाढलेल्या तापमानामुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावत चालली आहे. सूर्य आग ओकत असून, उन्हामुळे सर्वच गावांमध्ये दुपारच्या वेळी अघोषित संचारबंदीचे चित्र निर्माण झाले असल्याचे दिसते.

सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असल्याने राजकीय नेते त्यात व्यस्त आहेत. कुणाला पाणीटंचाईबाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळच नाही. त्यात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. प्रशासनाने पाणी समस्यांकडे लक्ष द्यावे.
दादाभाऊ शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com