Nana Patole : जनसामान्यांचा आवाज- नाना पटोले

Political Leader : भारतात लोकशाही व्यवस्था आहे. त्यात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण सध्या देशातली परिस्थिती अशी आहे की जनसामान्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही किंवा त्यांना तो ऐकायचाच नाही.
Nana Patole
Nana PatoleAgrowon
Published on
Updated on

Indian Politics : भारतात लोकशाही व्यवस्था आहे. त्यात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण सध्या देशातली परिस्थिती अशी आहे की जनसामान्यांचा आवाज सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही किंवा त्यांना तो ऐकायचाच नाही. पण अशा वातावरणातही एक नेता आहे जो जनसामान्यांच्या एका हाकेवर त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सज्ज होतो. तो नेता म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले.

ते कायमच त्यांच्या समाजकार्यासाठी चर्चेत राहिलेले आहेत. पटोलेंच्या राजकीय प्रवासाची सुरूवातच समाजकार्यातून झाली. शेतकऱ्यांसाठी आंदोलन, गोरगरीब मागासवर्गीयांच्या हक्कांची मागणी अशा अनेक गोष्टी नाना पटोले यांनी पुढाकार घेऊन केल्या आहेत. त्यांचा जन्मच शेतकरी कुटुंबात झाल्याने शेतकरी समाजाला होणारा त्रास त्यांनी स्वतः भोगला आहे. नाना पटोले यांच्या गावात अनेक समाजातील लोक गुण्यागोविंद्याने राहतात. प्रत्येक समाजावर झालेला, होत असलेला अन्याय ते लाहानपणापासून बघत आले आहेत.

त्यांचे वडील कृषी अधिकारी होते. पोलिस खात्यात व राजकारणात भ्रष्टाचाराचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे त्यांच्या वडिलांना खादी व खाकीचा तिटकारा होता, पण समाजकार्यात ते अग्रेसर होते. नाना पटोले सांगतात की, त्यांच्यावर समाजकार्याचे संस्कार हे त्यांच्या वडिलांमुळेच झाले आहेत. “स्वतःच्या खिशात कमी पैसे असूनही गरज असलेल्या प्रत्येक माणसाला मदत करणारे माझे वडील होते,” असं ते सांगतात. गोरगरीब, मागासवर्गातील लोक, कुठल्याही समाजाची- जातीची, वर्गाची कुठल्याही प्रकारच्या त्रासात असलेली व्यक्ती, सगळ्यांनाच नाना पटोले यांनी मदत केलीय. पटोलेंनी मदतीचा हात पुढे करून त्यांच्या समस्यांवर उपाय काढलाय.

ते कधीच भेदभाव करत नाहीत. यामुळेच नाना पटोले आणि जनसमान्याचं नातं एकदम घट्ट आहे. नाना पटोले सर्वांना एका हाकेवर भेटायला येतात. नाना पटोले राजकारणात, समाजात अत्यंत आदरणीय आणि ख्यातनाम व्यक्तिमत्व असले तरी त्यांच्या गावातील लोकांसाठी ते त्यांचे ‘नानाभाऊ’ आहेत. ते सर्वांना आपल्या कुटुंबातील सदस्यासारखीच वागणूक देतात. त्यांना भेटण्यासाठी कुठलीच अपॉइंटमेंट किंवा तारीख घ्यावी लागत नाही.

Nana Patole
Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

ते सदैव लोकांना भेटण्यासाठी, त्यांच्या समस्या ऐकण्यासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे लोक त्यांचे चाहते झाले आहेत. पटोले शेतकऱ्यांसाठी कायमच पुढाकार घेऊन चळवळ करतात. त्यांना आर्थिक मदत असो किंवा सरकारी योजनेअंतर्गत त्यांची कामं करून देणं असो ते प्रत्येक बाबतीत त्यांना मदत करत आले आहेत. वनजमीन कायद्यामुळे अनेक शेतकरी व आदिवासी समाजाच्या जमिनी अतिक्रमणात त्यांच्याकडून हिसकावून घेतल्या जात होत्या.

त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार होती. पण हा अन्याय दूर करण्यासाठी नाना पटोले यांनी चळवळीचं पाऊल उचललं. वनजमिनींवरील अतिक्रमण हटाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नाना पटोलेंसह अनेक शेतकरी व आदिवासी बांधव सहभागी झाले. या सरकारविरोधी आंदोलनामुळे शेतकरी बांधव व नाना पटोले यांना अटक करण्यात आली होती. हे सगळं पोळ्याच्या दिवशी घडत असल्याने तो दिवस शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाचा होता.

आणि याच दिवशी नाना पटोले यांना अटक होताच त्यांनी तुरूंगातच “आमचे हक्क मिळत नाही तोवर उपोषण” करण्याची भूमिका घेतली. नानांचे सहकारीसुद्धा यांच्यासोबत उपोषणाला बसले. शेवटी संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस न्यायालयाच्या अंतिम आदेशास स्थगिती दिली. त्यामुळेच आदिवासी व भूमिहीन शेत मजुरांना न्याय मिळाला. नाना पटोले यांनी अनेक जातीजमातींचा उद्धार करण्यासाठी, त्यांना शासनाच्या योजनेचा फायदा व्हावा, शिक्षणाच्या योग्य संधी उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने अनेक विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग यांचा समावेश ओ.बी.सी. प्रवर्गांमध्ये करून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी प्रयत्न केले.

नाना पटोले हे आपला वाढदिवस देखील जनसामान्यांसोबतच साजरा करतात. त्यांच्या वाढदिवसानिम्मीत ते छत्री वाटप, लोकगीतांचा कार्यक्रम असे अनेक उपक्रम राबवताना दिसतात. त्यांच्या वाढदिवसा निम्मीत आयोजित करण्यात आलेल्या भागवत पुराणाच्या कार्यक्रमांना हजारो लोक उपस्थित असतात व सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजनदेखील केले जाते. प्रथम आमदारपदी निवडून आल्यावर नाना पटोले यांनी ‘पलास’ या गावात सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून अनेक जोडप्यांचा संसार थाटून दिला. पुढे ही प्रथा १५ वर्ष सातत्याने सुरू ठेवण्यात आली.

Nana Patole
Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टी

जनसामान्यांच्या मदतीला धावून येणारे म्हणून त्यांची गावात ओळख आहे व नाना पटोले यांचे गावातील प्रत्येक माणसासाठी आपुलकीचे संबंध आहेत. नाना पटोले यांनी छावा संग्राम परिषदेच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार व रोजगारभिमुख प्रशिक्षण योजनांना चालना दिली. पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, रोजगार मेळावे, कौशल्य विकास कार्यशाळा असे विविध उपक्रम त्यांनी राबवले व त्याचा लाभ शेकडो विद्यार्थ्यांना झाला आहे. ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने पोलिस विभागात कार्यरत आहेत.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष असताना महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वंकष बाजूने विचार केला. महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला खूप मोठी संधी आहे. वजनदार मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे बीज महाराष्ट्राने विकसित करून ग्रामीण भागातील रोजगार संधीला चालाना मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यामुळे रोजगारात वाढ झाली. अशा प्रत्येक बाबतीत नानाभाऊ पटोले यांनी निःस्वार्थपणे मदतीचा हात पुढे करून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.

नानाभाऊ पटोले फक्त खुर्चीत बसून आदेश सोडणारे नाहीत तर परिस्थितीचा सखोल अभ्यास करून जनसामान्यांसाठी कार्य करणारी व्यक्ती आहे. लॉकडाऊनमध्येही नाना पटोले यांनी आपल्या मतदारसंघातील अनेक घरांमध्ये किराणा मालाचा पुरवठा करून मदत केली. या काळात नाना पटोले यांनी ऍमब्यूलंस सेवा सुरू करून दिली. सरकारने ज्यांना नाकारलं अश्या गोंडगोवारी समाजाला सुद्धा नानाभाऊ यांनी आधार दिला आहे.

नानाभाऊ पटोले जेव्हा लखांदूर येथून आमदार पदी निवडून आले तेव्हा त्यांनी गोंडगोवारीं समाजाची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, गोंडगोवारी समाजाची कोंडी फोडण्याच काम नानभाऊंच्या माध्यमातून झालं आहे. गोंडगोवारी समाजाचा दरवर्षी साजरा होणारा स्मृतीदिनाच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध होणारा निधी नानाभाऊंनीच त्यांना मिळवून दिला आहे. नानाभाऊ यांनी गोंडगोवारी समजासाठी दोन आश्रमशाळासुद्धा बांधून दिल्या आहेत. त्यामुळे समाजातील मुलांचे शिक्षण व इतर सामाजिक कार्यक्रम करू शकतात.

वनजमीन कायद्याविरूद्ध नानाभाऊंनी उठाव केला. त्यामुळेच आज गोंडगोवारी समाजातील लोकांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या आहेत व ते शेती करून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. या सर्वांमुळेच नाना पटोले यांची नाळ जनसामान्यांसोबत जोडली गेली आहे. ते गावातील लोकांपासून कितीही दूर असले तरी त्यांचे लक्ष कायम आपल्या लोकांवर असते आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते तत्पर असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकही “एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह” म्हणत नाना पटोले यांच्या दारातून समाधानाचे हसू घेऊन बाहेर पडतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com