Marathwada Drought : मराठवाड्यातील दुष्काळ आणि अतिवृष्टी

Farmer Issue : शेतकरी पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतो. ठरलेल्या काळातच ठरलेली पिके तो घेऊन स्वतःचे व इतरांचे पोट भरत असतो. पिकाची नासाडी होताच त्याच्या हातातील सगळे ऐश्वर्य नष्ट होऊन जाते आणि त्याला आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा कोणताच मार्ग राहत नाही.
Nana Patole
Nana Patole Agrowon
Published on
Updated on

Agriculture Issues : शेतकरी पूर्णतः निसर्गावर अवलंबून असतो. ठरलेल्या काळातच ठरलेली पिके तो घेऊन स्वतःचे व इतरांचे पोट भरत असतो. पिकाची नासाडी होताच त्याच्या हातातील सगळे ऐश्वर्य नष्ट होऊन जाते आणि त्याला आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा कोणताच मार्ग राहत नाही. सद्य परिस्थितीत निसर्गराजा महाराष्ट्रावर कोपल्याची चिन्हे दिसून येतात. एकाच वर्षात दुष्काळाची स्थिती आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांना भोगावी लागली आहे.

मराठवाड्यात लोकसभा निवडणुका तोंडावर असताना दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती. सोलापूर, नगर, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात केवळ ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्या पाण्याची पातळी अजून कमी होण्याचे वर्तवले जात होते. त्यामुळे जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक योजना बंद पाडण्यास सुरूवात झाली होती. पण दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना घेणे अपेक्षित असलेले निर्णय मात्र सत्ता पक्षाने घेतले नाहीत. सत्ताधारी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त असल्याचा आरोप दुष्काळग्रस्तांनी केलाय.

Nana Patole
Wet Drought Inspection Tour : छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा; नांदेड आणि परभणीला देणार भेट

उजनी धरणातून पाणी सोडले असून पाणी जपून वापरा असा इशारा तेथील स्थानिकांना देण्यात आला होता. उजनी धरणाची अवस्था खूपच बिकट झाली होती, उजनी धरणाने इतिहासातील नीचांकी पातळी गाठली. यातच उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्याने पाण्याचे बाष्पीभवन सुरू झाले. जलाशयावर सुरू असलेल्या पाणी उपशामुळे पाणी पातळी झपाट्याने खालावू लागली. त्या परिस्थितीत नाना पटोले यांनी दुष्काळग्रस्त भागांना भेट देत तिथली पाहणी केली. "शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. काँग्रेस पक्ष कायम त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करेल," असं म्हणत नाना पटोले यांनी कुठल्याही शेतकऱ्याने आत्महत्या न करण्याचे आवाहन केले. "वॉटर ग्रीड योजना राबवण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे. ते मोठे रस्ते बांधू शकतात पण गरिबांसाठी साधी पाण्याच्या व्यवस्था करू शकत नाहीत?" असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला.

अशी दुष्काळी परिस्थिती असतानाच पावसाने जोरदार हजेरी लावत मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण केली. पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. ५,००० हजार हून अधिक लोकांना त्यांची घरे सोडून सुरक्षित भागात आश्रय घ्यावा लागला. स्थानिक प्रशासनाने अनेक लोकांना मदतीचा हात पुढे करत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. २०० लोक सुखरूप असल्याची, तर ९० लोकांना जीवघेण्या परिस्थितीतून वाचवल्याची माहिती मिळाली. कृषी क्षेत्राला यामुळे विशेष फटका बसला आहे. ११ लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीयोग्य जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे.

Nana Patole
Drought Crisis : नाशिक जिल्ह्यात टंचाईवर झालेला ९० कोटींचा खर्च मिळेना

१४.६ लाख शेतकरी कष्टाने कमावलेले पैसे गमावून बसले आहेत. परंतु सरकार त्यावर काहीच करत नाही. याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्याच्या लाखांदूर येथे पायदळ हल्लाबोल मोर्चा काढला. या मोर्चात हजरो शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होते. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये तात्काळ आर्थिक मदत, कृषी पंपांना दिवसा विद्युत पुरवठा करावा अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी नाना पटोले यांनी या मोर्चातून आवाहन केले.

"देशातले सरकार शेतकरीविरोधी आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कर्जाचा बोजा त्यांच्यावर बसला आहे. असे असतानाही सरकारने नुकसान भरपाई दिलेली नाही. पन्नास हजार रूपये देण्याचे आश्वासन दिले. तेदेखील अद्याप मिळालेले नाहीत. परिणामी राज्यात आणि विदर्भात शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या वाढत आहेत. मात्र हे सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षा जाड असलेलं सरकार आहे. या सरकारला जाग येण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आहे." असे सांगून नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com