Warkari Welfare: राज्य सरकार वारकऱ्यांना कुठलीही कमतरता भासू देणार नाही

Eknath Shinde: यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत लवकरच सुपूर्द केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Alandi News: यंदाच्या आषाढी वारीदरम्यान देखील राज्य सरकार वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देणार नाही. सन २०२३ व २४ दरम्यान मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या परिवारांना येणाऱ्या आषाढीच्या पूर्वी अत्यंत आदराने प्रत्येकी ५ लक्ष रुपयांचा निधी सुपूर्द केला जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० वा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी (ता.९)आळंदीत आले होते. या वेळी आळंदी येथे सर्व मानाच्या पालखींचे प्रमुख व विश्वस्त यांच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली.

Eknath Shinde
Unseasonal Rain : वैभववाडी, फोंडा परिसरात पावसाच्या जोरदार सरी

या वेळी वर्षभरापूर्वीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत सुयोग्य आणि चांगल्या सुविधा पुरविल्याबद्दल आळंदीत विविध संतांच्या मानाच्या पालखी प्रमुखांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विठ्ठलाची मूर्ती भेट देऊ केली. मानाची पालखी प्रमुख व विश्वस्त यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निवेदन स्वीकारत तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याबाबत अभिवचन दिले.

Eknath Shinde
India-Pakistan War: भारत पाकिस्तानमध्ये युध्दविराम; सायंकाळी ५ वाजल्यापासून लष्करी कारवाई थांबवली

ते म्हणाले, की आपल्या सर्व समस्या तथा सकल संतांच्या तीर्थस्थानांसाठी मंदिरासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. गत वर्षीप्रमाणे यंदाही सर्व पालखी सोहळ्यांच्या सुयोग्य समन्व्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून अक्षय महाराज भोसले यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मागील वर्ष प्रत्येक दिंडीस देण्यात आलेल्या २० हजार निधीचा वारकरी दिंड्यांना खूप मोठा फायदा झाला, असा गौरवपूर्ण उल्लेख देखील सर्व पालख्यांचे प्रमुख व विश्वस्तांनी या वेळी केला.

पंढरपूर येथील संत नामदेव महाराज, नाशिक येथील संत निवृत्तिनाथ महाराज, आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज, सासवड येथील संत सोपान काका, मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई महाराज, पैठण येथील संत एकनाथ महाराज, देहू येथील संत तुकाराम महाराज असे मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांसह संत वंशज, ज्येष्ठ कीर्तनकार उपस्थित असल्याची माहिती भोसले महाराजांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com