Warkari Sammelan : वारकरी संप्रदाय म्हणजे अध्यात्म, संस्काराचा मोठा ठेवा

Bhagwat Tradition : वारकरी संप्रदाय अध्यात्म आणि संस्काराचा मोठा ठेवा आहे, असे विचार संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. निरंजननाथ योगी महाराज यांनी व्यक्त केले.
Warkari Sammelan
Warkari Sammelan Agrowon
Published on
Updated on

Solapur News : भागवत संप्रदायाचा पाया मजबूत असल्याने आज विज्ञान युगातही अध्यात्म यशस्वी ठरत आहे. वारकरी संप्रदाय अध्यात्म आणि संस्काराचा मोठा ठेवा आहे, असे विचार संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. निरंजननाथ योगी महाराज यांनी व्यक्त केले.

सांगोला येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचे पहिले राज्यस्तरीय वारकरी संमेलन रविवारी (ता. ९) रोजी झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन निरंजननाथ योगी महाराज बोलत होते.

Warkari Sammelan
Agriculture Transport : ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, गोपाळअण्णा वासकर महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, ह.भ.प. नामदेव चवरे महाराज, ह.भ.प. अक्षय भोसले महाराज, ह.भ.प. जोतीराम चांगभले महाराज, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर भगरे महाराज, ह.भ.प. बिरा बंडगर महाराज, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, सतीश सावंत तसेच वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, वारकरी जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Warkari Sammelan
AI in Agriculture: ऊसशेतीत ‘एआय’ वापराबाबत शनिवारी बारामतीत कार्यशाळा

संमेलनामध्ये घेण्यात आलेले ठराव ठराव -

कलाकार मानधन समितीमध्ये जिल्ह्यात भाविक वारकरी मंडळाचा एक प्रतिनिधी असावा

कलाकार मानधान निवड करताना ५० टक्के वारकरी असावेत.

माघ वारीला आषाढी वारीप्रमाणे प्रत्येक दिंडीला मानधान सुरु करावे.

प्रत्येक जिल्ह्यात एक वारकरी भवन उभे करावे.

शालेय शिक्षणामध्ये संत वाड:मय जास्त असावे.

भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी जिथं सप्ताह संयोजक असतील तिथं कीर्तनामध्ये इतर गीतांना बंदी असावी.

वारकरी शिक्षण घेतलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवेशसाठी ५ टक्के मार्क गृहीत धरावेत.

महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रामध्ये मांस विक्री बंदी व दारू बंदी असावी. तीर्थक्षेत्राच्या ३ कि. मीटर आत बंदी असावी असे विविध प्रकारचे ठराव संमत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com