Monsoon Rain : पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेली शेतातील माती

Rain Update : नाशिक जिल्ह्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर रविवार (ता. १६) रोजी विविध ठिकाणी पावसाचा जोर दिसून आला. निफाड सिन्नर देवळा, सटाणा, नांदगाव व येवला तालुक्यात पावसाने जोरदार ते मध्यम स्वरूपात हजेरी लावली.
Agriculture Soil
Agriculture SoilAgrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर रविवार (ता. १६) रोजी विविध ठिकाणी पावसाचा जोर दिसून आला. निफाड सिन्नर देवळा, सटाणा, नांदगाव व येवला तालुक्यात पावसाने जोरदार ते मध्यम स्वरूपात हजेरी लावली. तर नाशिक, चांदवड तालुक्यात हलक्या सरी बरसल्या. त्यामध्ये निफाड तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. थेरगाव परिसरात अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाल्याने येथील शेतकऱ्यांची शेतातील माती वाहून गेल्याचे समोर आले आहे.

रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पाऊस सुरू झाल्यानंतर काही क्षणात सर्वत्र पाणीच पाणी झाले. निफाड तालुक्यातील सुकेणे, थेरगाव, दिक्षी, ओझर, जिव्हाळे, शिरसगाव, कोकणगाव या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. सायंकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाल्याचे दीड तासातच परिसर जलमय झाला होता. परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली. तर शेतातूनही पाणी वाहत असल्याचे पाहायला मिळाले.

Agriculture Soil
Slit Remove : ‘हरणबारी’तून गाळ काढण्यास प्रारंभ

सध्या शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.पाऊस झाल्यानंतर ओल तपासून वापसा होताच शिवारात पेरण्या केल्या जात आहेत. त्यामुळे सध्या शिवार गजबजू लागले आहेत या जोरदार पावसामुळे पावसाने पेरणीची कामे मंदावली आहेत. शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणीची तयारी सुरू होती; मात्र आलेल्या पावसामुळे आता पेरण्या वापसा होईपर्यंत थांबणार आहेत.

निफाड तालुक्यातील लासलगाव, देवगाव, ओझर, नांदूर मधमेश्वर या महसूल मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही क्षणात पाणीच पाणी झाल्याचे दिसून आले. तर सिन्नर तालुक्यातील शहा,नांदूर शिंगोटे व वडांगळी या महसूल मंडळामध्ये मध्यम ते हलका पाऊस झाला. याशिवाय पावसाची प्रतीक्षा असलेल्या पूर्व भागातील अंदरसुल व नगरसुल या परिसरातही मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Agriculture Soil
Heavy Rain : लातूरला सहा, धाराशिवला दोन तालुक्यांत अतिवृष्टी
एक एकर क्षेत्रावरील सुपीक माती झालेल्या जोरदार पावसामुळे पाण्यासोबत वाहून गेली. दुष्काळात हा तेरावा महिना आला आहे. आता पेरणी करण्याचा हंगाम असताना पावसाने खोळंबा केला. आता जमीन करण्यासाठी येणारा खर्चही करण्याची परिस्थिती नाही. तर नुकसान होउन अजूनही कुणी पाहणीसाठी बांधावर आले नाही. पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी ही मागणी आहे.
बाळासाहेब लोखंडे,

नुकसानग्रस्त शेतकरी झालेला पाऊस

मंडळ पाऊस(मिमी)

लासलगाव २२.५

देवगाव ४२.८

ओझर ४६.५

नांदूर ३४.५

शहा २१.३

नांदूर २०

वडांगळी २३

नगरसुल २५

अंदरसुल २५

देवळा २७

लोहनेर २७

मातीचा दीड फूट थर गेला वाहून

जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक शिवारांमधून पाणी वाहिल्याचे दिसून आले. ओढनाल्यामधून वाहणारे पाणी शेतात आल्याने पाण्याच्या प्रवाहासोबत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची माती वाहून गेली आहे.जिव्हाळे येथील शेतकरी बाळासाहेब लोखंडे यांच्या शेतातील जवळपास एक ते दीड फूट माती वाहून गेल्याचे शिवारात नुकसान झाले आहे.

पावसाने केलेले नुकसान

टोमॅटो लागवडीच्या सऱ्या वाहून गेल्या.

मका पेरणी झालेल्या शेतात बियाणे पाण्यासोबत वाहून गेले.

द्राक्ष बागेतील टाकलेले शेणखत वाहून गेले.

अनेक ठिकाणी बांध फुटल्याने शेताचे नुकसान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com