Heavy Rain : लातूरला सहा, धाराशिवला दोन तालुक्यांत अतिवृष्टी

Rain Update : धाराशिव जिल्ह्यात सोमवारी (ता. १०) रात्री पावसाने चांगलीच बॅटिंग केली. यात लातूर जिल्ह्यात दहापैकी सहा तालुक्यांत तर धाराशिव जिल्ह्यातील आठपैकी दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली.
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्ह्यात सोमवारी (ता. १०) रात्री पावसाने चांगलीच बॅटिंग केली. यात लातूर जिल्ह्यात दहापैकी सहा तालुक्यांत तर धाराशिव जिल्ह्यातील आठपैकी दोन तालुक्यांत अतिवृष्टी झाली. या आठही तालुक्यांत ६० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. या पावसाने आता खरिपातील पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला असून वापसा होताच शेतकरी आता पेरण्यांना सुरुवात करणार आहेत. रात्रभर झालेल्या पावसाने नदीनाल्यांना पूर आला असून काही भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी (ता. ११) सकाळी सातपर्यंत सुरू होता.

या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून मंगळवारी दोन्ही जिल्ह्यांत ढगांची गर्दी होती. पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. काही दिवसांपासून दोन्ही जिल्ह्यांत पाऊस पडत असला तरी शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा होती. चांगला पाऊस होऊनही जमिनीत पुरेशी ओल नसल्याचे शेतकरी सांगत होते.

Monsoon Rain
Monsoon 2024 : पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

यामुळेच मोठ्या पावसाची आशा असतानाच सोमवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस मंगळवारी सकाळपर्यंत पडत होता. या पावसामुळे जमिनीच्या बाहेर पाणी निघून नदीनाल्यांना पूर आला. काही भागांत पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शिवारात पाणी साचून काही भागांत बांधही फुटले आहेत. रात्रभर सलग झालेल्या पावसाने भूजलाची पातळी वाढून कोरड्या पडलेल्या विहिरींमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत दोन्ही जिल्ह्यांत आतापर्यंतचा सर्वांत मोठा पाऊस झाला आहे. यात लातूर जिल्ह्यात सरासरी ६३.७ तर धाराशिव जिल्ह्यात ४५ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाने खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात होणार असून शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खते खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. पावसाने ओसाड पडलेली बाजारपेठ अचानक फुलून गेली.

Monsoon Rain
Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

लातुरात सहा तालुक्यांत अतिवृष्टी

लातूर जिल्ह्यात सोमवारी रात्री ६३.७ मिमी पाऊस झाला. आतापर्यंत सरासरी १३५.८ मिमी पाऊस झाला असून सोमवारी सायंकाळी सर्वाधिक पाऊस निलंगामध्ये तर सर्वांत कमी पाऊस जळकोट तालुक्यात झाला. तालुकानिहाय पडलेला पाऊस व कंसात आतापर्यंत पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे ः लातूर ७७.५ (१५६.१), औसा ८३.६ (१७०.५), अहमदपूर ४१.२ (९२.६), निलंगा ८५.८ (१४९), उदगीर १६.२ (९०.३), चाकूर ७७.३ (१५४.२), रेणापूर ७८.२ (१६५.५), देवणी २४.६ (१०५), शिरूर अनंतपाळ ७३.३ (१३५.९), जळकोट ९.८ (३५.६).

धाराशिवला दोन तालुक्यांत बॅटिंग

धाराशिव जिल्ह्यात सोमवारी रात्री ४५.१ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. यात सर्वाधिक पाऊस कळंबर तालुक्यात तर सर्वांत कमी पाऊस परंडा तालुक्यात झाला. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १२३.१ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय रविवारी पडलेला पाऊस व कंसात आतापर्यंत पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे ः धाराशिव ४१.६ (९९.६), तुळजापूर ४९.६ (१५०), परंडा १४.७ (१०१.१), भूम ३१.९ (११९.७), कळंब ६८.६ (११०), उमरगा ६०.७ (१६४.६), लोहारा ४०.१ (१०६.३), वाशी ४६.७ (१३८.९).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com