Slit Remove : ‘हरणबारी’तून गाळ काढण्यास प्रारंभ

Free Sludge for Farmers : हरणबारी धरण प्रकल्प (ता. बागलाण) येथून काढण्यात येणारा सुपीक गाळ शेती व पिकासाठी उपयुक्त असेल. नागरिकांना तो मोफत दिला जाणार आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ सोमवारी (ता. २७) झाला.
Slit Removal
Slit RemovalAgrowon

Antapur News : हरणबारी धरण प्रकल्प (ता. बागलाण) येथून काढण्यात येणारा सुपीक गाळ शेती व पिकासाठी उपयुक्त असेल. नागरिकांना तो मोफत दिला जाणार आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ सोमवारी (ता. २७) झाला. हजारो शेतकरी गाळ घेऊन जाणार असत्याने पुढील काळात धरणातील पाण्याच्या क्षमतेत वाढ होणार असल्याने पिण्याच्या पाण्यासह काही प्रमाणात दुष्काळावर मात करणे शक्य होणार आहे.

मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेचे तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनवणे यांनी या कामाचा फायदा विशद केला. आमदार दिलीप बोरसे, द्वारकाधीश साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत, इंजिनीअर संजय भामरे, डॉ. प्रशांत सोनवणे, बाजार समितीचे संचालक विलास सावंत, पंकज भामरे, दीपक कांकरिया, समाधान देवरे, रामदास पाटील, गजानन साळवे यांच्या हस्ते नारळ अर्पण करून गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला.

Slit Removal
Slit Remove Works : झेडपी, जलसंधारण, जलसंपदाची कामे ठप्प

सोनवणे म्हणाले, की कामासाठी पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, तहसीलदार कैलास चावडे, कार्यकारी अभियंता विश्वास ठोके, एस. खैरनार संबंधित अधिकारी यांनी तातडीने परवानगी दिली. ‘द्वारकाधीश’चे अध्यक्ष शंकरराव सावंत, विकास कांकरिया, अशोकाचंद्र फाउंडेशनचे दीपक कांकरिया यांनी पोकलेन, जेसीची, डम्पर उपलब्ध करून दिले आहेत. या कामाचे वैयक्तिक कोणालाच श्रेय नसून शंभर टक्के पारदर्शकता ठेवून नियोजन करण्यात येणार आहे.

के. पी. जाधव, कृषिभूषण खंडेराव शेवाळे, सुभाष कांकरिया, सतीश भामरे, अनिकेत सोनवणे, राजीव सावंत, साहेबराव गवळी, मधुकर चौधरी, सुभाष भामरे, तात्या दीक्षित, राजू कुटे, प्रमोद भामरे, विकास बत्तीभो, विजय पगार, सतीश सोनवणे, दिनेश सावळा, किरण पाटील, विनोद पाटील, प्रवीण सावंत, राजू भोये, बंटी खैरनार, अविनाश मानकर, भैरूलाल गवळी पांच्यासह साल्हेर, मुल्हेर आदिवासी भागासह मोसम, करंजाड, तुंगाडी खोऱ्यातीत शेतकरी उपस्थित होते. प्रवीण भामरे यांनी प्रास्ताविक करून पंकज भामरे यांनी आभार मानले.

Slit Removal
Dam Slit : शेतकऱ्यांसाठी धरणातील गाळ मोफत उपलब्ध

यांनी दिली वैयक्तिक देणगी

आमदार दिलीप बोरसे...दोन लाख ११ हजार

डॉ. प्रसाद सोनवणे...एक लाख ११ हजार

अनिकेत सोनवणे, सुगी फार्म, अंतापूर...५१ हजार

माजी जि. प. सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे...२१ हजार

पंकज भामरे, संचालक, नामपूर बाजार समिती...२१ हजार

मोसम खोरे जलसंवर्धन समितीने धरणातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. भविष्यात जलसाठ्यात होणारी वाढ दुष्काळ निवारणाची नांदी ठरेल. गाळ काढण्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे सेवामावी संस्था, दानशूर व्यक्तीनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
डॉ. प्रसाद सोनवणे, संचालक, मविप्र
गेल्या ४० वर्षांपासून हणबारी धरणातील गाळ काढण्यात आला नसून हा गाळ शेती पिकासाठी अत्यंत उपयुक्त असून प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गाळ टाळल्यास मातीची पोत सुधारणार असून उत्पन्नात वाढ होणार आहे.
सचिन सावंत, कार्यकारी संचालक, द्वारकाधीश साखर कारखाना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com