Vitthal Rukmini Mandir : एकीकडे पावसाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर झिरपू लागले; दुसरीकडे ग्रामस्थांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा

Pandharpur Water Scarcity News : सध्या राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर वाढला असून सलग दोन ते तिन दिवस पाऊस होत आहे. दरम्यान पंढरपुरमध्ये देखील पावसाचा फटका बसला असून विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती लागली आहे. तर टेंभुर्णीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला आहे.
Vitthal-Rukmini Temple
Vitthal-Rukmini TempleAgrowon

Pune News : गेल्या दोन ते दिन दिवसापासून राज्याच्या विविध जिल्ह्यात मॉन्सूनने हजेरी लावली आहे. मॉन्सूनचा जोर अनेक जिल्ह्यांध्ये दिसत असून त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. यादरम्यान पंढरपूर येथे एकाच वेळी नाराजी आणि संतापाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. एकीकडे सलग पावसामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती लागल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात आठ दिवसांपासून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात विस्कळीपणा आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (ता.१०) ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी दीडशे कोटीच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. याच निधीतून सध्या मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. मात्र सलग पावसामुळे नैवेद्य दरवाजा, रुक्मिणी सभागृहाच्या छतामधून पाणी झिरपत आहे. भाविकांच्या अंगावर पाणी पडत असल्याने भाविकांत नाराजी पसरली असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Vitthal-Rukmini Temple
Water Scarcity : बुलडाण्यात सव्वादोन लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर

मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण

दरम्यान भाविकांच्या नाराजीसह झिरपणाऱ्या पाण्यावरून मंदिर प्रशासनाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. लवकरच वॉटरप्रूफिंगचे कामही सुरु केले जाईल असे विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी म्हटले आहे.

तसेच शेळके म्हणाले, मागील चार दिवसांपासून पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर पाऊस सूरू असून अतिवृष्टीमुळे मंदिराच्या काही भागात पाणी झिरपले. यावर प्रशासनाकडून लवकरच उपाययोजना करण्यात येईल, असेही शेळके यांनी म्हटले आहे.

Vitthal-Rukmini Temple
Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

टेंभुर्णीत ग्रामस्थांचा संताप

यंदा सोलापूरसह राज्याच्या विविध भागात पाणी टंचाईची भीषणता गडद झाली होती. त्याच्या झळा अद्यापही कमी झालेल्या नाहीत. सध्या मॉन्सूनच्या सरी अनेक जिल्ह्यात कोसळत असूनही पाणी टंचाईची समस्या कमी झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावातही पाण्याची भीषणता आहे. त्यातच मागील आठ दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला.

उजनी धरणातून पाणी पुरवठा होत असतानाही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळेच पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आल्याचे म्हणणे ग्रामस्थांचे आहे. तर ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळेच गेल्या दिवसांपासून ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com