Kolhapur Farmers : पावसाने बळीराजा सुखावला! कोल्हापूर जिल्ह्यात ९५ हजार हेक्टरवर होणार भात लावण

Paddy Farm : ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, ३० हजार हेक्टरवर भुईमूग, २२ हजार हेक्टरवर नांगली, २ हजार हेक्टरवर मका या पद्धतीने पिकांची पेरणी होणार आहे.
Kolhapur Farmers
Kolhapur Farmersagrowon

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील अनेक तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. काल आणि आज दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा काही वेळ केवळ शिडकावा झाला. दोन दिवसांपासून झालेल्या पावसाळी वातावरणाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश पावसाने पाणीच पाणी झाले.

मागच्या वर्षभरात एकदाही प्रवाहीत न झालेले ओढे-नाले यंदा मृगाच्या पहिल्याच पावसात जोरदार ओसंडून वाहिले. काही ठिकाणी केलेल्या पेरण्या वाहून गेल्या. पावसाचे वातावरण झाले असल्याने शेतकरी निश्‍चिंत झाला आहे. तसेच धरण परिसरातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

काल आणि आज ढग आले आहेत परंतु पाऊस झाला नाही. चारच्या सुमारास दक्षिणेकडील भागात तुरळक सरी पडल्या; पण नंतर त्याही थांबल्या. पावसाचे वातावरण तयार झाले असून, भात पेरणी केलेला शेतकरी मात्र मॉन्सूनसारख्या संततधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. दोन दिवसात झालेल्या पावसाने भूईमूग आणि सोयाबीन पेरणीला वेग आला आहे.

यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे ९५ हजार हेक्टरवर भाताची लावण होणार आहेत. त्यात ३५ ते ४० हजार हेक्टरवर धूळवाफ पेरणी व ५५ ते ६० हजार हेक्टरवर रोप लावण होईल, असा अंदाज आहे. तर ४२ हजार हेक्टरवर सोयाबीन, ३० हजार हेक्टरवर भुईमूग, २२ हजार हेक्टरवर नांगली, २ हजार हेक्टरवर मका या पद्धतीने पिकांची पेरणी होणार आहे.

Kolhapur Farmers
Rain Orange Alert Kolhapur : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, विजांच्या कडकडाटासह मुसळधारेचा इशारा

जिल्ह्यात ९५ हजार हेक्टरवर भाताची लावण होणार आहे. त्यासाठी सरासरी ३५ ते ४० हजार क्विंटल भात बियाण्यांची गरज लागते. पण, शेतकरी आपल्या घरातील भाताच्या बियाण्यांचा वापर करून पेरणी करतात; तर काही शेतकरी बाजारात बियाणे खरेदी करतात.

कृषी विभागाने २३४ हजार ९५० क्विटल भात बियाण्यांची मागणी केली आहे. बाजारात खासगी कंपन्यांची बियाणे उपलब्ध आहेत. भुईमुगाच्या वाणाची २ हजार २५६ क्विटलची मागणी आहे. सोयाबीन ११ हजार २६१ क्विंटलची मागणी आहे. महाबीजचे भात बियाणे वगळता अन्य कंपन्यांची भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांची बियाणे उपलब्ध आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com