Vitthal Rukmini Mandir : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे गाभारा संवर्धन काम महिनाअखेर पूर्ण होणार

Temple Work Update : महिनाअखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्ववत करण्याचे नियोजन असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी दिली.
Vitthal Rukmini Temple
Vitthal Rukmini TempleAgrowon

Pandharpur News : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली १५ मार्चपासून सुरू करण्यात आले आहे, हे काम ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. तथापि, कामास सुरुवात केल्यानंतर अनेक प्रकारची नव्याने दुरुस्तीची कामेही करण्याचे निदर्शनास आल्याने हे नियोजन लांबले,

पण आता मे महिनाअखेरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन पूर्ववत करण्याचे नियोजन असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज यांनी दिली.

Vitthal Rukmini Temple
Vitthal-Rukmini Mandir : पंढरपूरच्या विकासाबरोबरच नागरी प्रश्‍न सोडविण्याची गरज

मंदिर समितीचे सर्व सदस्य यांनी पुरातत्त्व विभाग, वास्तुविशारद व ठेकेदार यांच्या समवेत गाभाऱ्याची पाहणी करण्यात आली. त्यानंतर सहअध्यक्ष औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गाभारा संवर्धन कामाबाबत आढावा घेण्यात आला. या वेळी सदस्या शकुंतला नडगिरे,

Vitthal Rukmini Temple
Vitthal Darshan : आता विठ्ठलाचं दर्शन फक्त पाच तास घेता येणार!

डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, दूरदृष्यप्रणालीद्वारे अतुलशास्त्री भगरे गुरुजी तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार रमेश येवले उपस्थित होते.

औसेकर महाराज म्हणाले, की श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही, याची दक्षता घेणे व मूर्ती संरक्षणास प्राधान्य देणे गरजेचे आहे.

गाभाऱ्यातील फरशी काढल्यानंतर काही नव्याने कामाच्या बाबी निदर्शनास आल्यामुळे व काम दर्जेदार, पुढील अनेक वर्षे टिकेल या दृष्टीने करण्यात येत आहे. या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही, कामे दर्जेदार व मूर्तीचे संरक्षण करून करावयाची असल्याने वारकरी भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com